Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजखासगी लक्झरी बस उलटली; अपघातात ३५ प्रवासी जखमी

खासगी लक्झरी बस उलटली; अपघातात ३५ प्रवासी जखमी

नांदगाव। संजय मोरे Nandgaon

- Advertisement -

नांदगाव -मालेगांव रस्त्यावर असलेल्या नाग्यासाक्या गावाजवळ आज तीन वाजेच्या सुमारास खासगी लक्झरी बस उलटून झालेल्या अपघातात 30 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. ५ गंभीर जखमी प्रवाशांना मालेगांव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरहून मालेगांव लग्न समारंभासाठी जात असतांना प्रवाशांनी भरलेली बस नाग्यासाग्या वस्तीजवळ रस्त्याच्या कडेला पलटी झाली. अपघात झाल्यानंतर बस मधील प्रवाशांनी आक्रोश सुरू केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

YouTube video player

स्थानिक नागरिकांनी अपघातानंतर जखमी प्रवाशांना तातडीने बाहेर काढून मदत कार्य केले. या अपघातात काही लहान मुलेही जखमी झाल्याचे कळते अपघाताची माहिती मिळताच नांदगाव पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बचाव कार्य करत अपघातग्रस्तांना नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या खाजगी बस मध्ये अपघातात 50 ते 55 प्रवासी होते .यापैकी 30 किरकोळ जखमी तर 5 गंभीर प्रवासी जखमी झालेत. जखमी प्रवाशांवर नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.काजल तुसे यांनी प्राथमिक उपचार केले सोडण्यात आले..

या अपघातातील गंभीर जखमी नाजिमा शेख जावेद(50) , हबिबा शेख खदीर(65), परिश शेख अनवर(5), रझिया सैय्यद खाजा,निशाद असद अन्सारी सर्व (रा..छत्रपती संभाजीनगर ) यांना पुढील उपचारासाठी मालेगांव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

बागलाण तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी

0
सटाणा | बागलाण तालुक्यातील ताराहाबाद, नामपूर, ढोलबारे, वीरगाव व परिसरात आज सायंकाळच्या दरम्यान अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल...