Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAccident News : सीएनजी टँकर आणि मिनी बसचा भीषण अपघात; गॅस गळतीमुळे...

Accident News : सीएनजी टँकर आणि मिनी बसचा भीषण अपघात; गॅस गळतीमुळे लोकांसह जनावरे भाजली

मुंबई | Mumbai 

मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) बावनदी (ता.रत्नागिरी) येथे सीएनजी वाहून नेणारा टँकर आणि एका खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात होऊन टँकरमधील सीएनजीची (CNG) गळती झाल्याची घटना आज (रविवारी) घडली आहे. हा गळती झालेला सीएनजी हवेत पसरल्यामुळे त्यात लागलेली आग एका घरापर्यंत पोहोचली. या आगीमुळे एक म्हैस भाजली असून, घराजवळची रिक्षा आणि दोन दुचाकींचे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

तर अपघातग्रस्त खासगी ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना (Passengers) दुखापत झाली असून, त्यांना जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच टँकरमधील उरलेला सीएनजी काढून घेण्यासाठी वाहतूक थांबवण्यात आली होती. सकाळी सुमारे ८ वाजेच्या दरम्यान बावनदी परिसरात ही दुर्घटना घडली असून, चिपळूणहून रत्नागिरीकडे निघालेली मिनी बस (वडाप) निवळी गावाजवळ असताना, मागून भरधाव वेगात आलेल्या गॅस टँकरने बसला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मिनी बस (Mini Bus) थेट दरीत कोसळली.

YouTube video player

दरम्यान, या धडकेनंतर टँकरमधून गॅसची गळती होऊ लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने प्रशासनाला याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल व रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. यानंतर मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले असून, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या अपघाताचे (Accident) नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. तसेच जखमींची अचूक संख्या देखील अजून कळू शकलेली नाही. तर घटनास्थळी प्रशासनाची टीम उपस्थित असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...