Sunday, December 15, 2024
Homeब्रेकिंग न्यूज"गेल्या दहा वर्षांत त्यांनी…"; प्रियांका गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

“गेल्या दहा वर्षांत त्यांनी…”; प्रियांका गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

नंदुरबार | Nandurbar

देशात सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु असून येत्या सोमवारी (दि. १३ मे) रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान (Voting) पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज चौथ्या टप्प्यातील मतदारसंघांमधील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज सायंकाळपर्यंत राज्यात विविध नेत्यांच्या सभा पार पडणार आहेत. अशातच आज दुपारच्या सुमारास काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांची नंदूरबार येथे कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. गोवाल पाडवी (Dr. Goval Padavi) यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.

- Advertisement -

यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना गांधी म्हणाल्या की, “काँग्रेस (Congress) कायम जनतेच्या सेवेचा आणि विकासाचा विचार करते. तर दुसरीकडे भाजप (BJP) पूर्णपणे विरोधी विचार करते. जेव्हा जेव्हा आदिवासींवर आत्याचार होतो, त्यावेळी भाजप गप्प राहते.आदिवासी संस्कृतीचा आदर भाजप करीत नाहीत, ते संस्कृती बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. आदिवासींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपने एकमेव आदिवासी मुख्यमंत्री असलेल्या हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना झारखंडमध्ये निवडणुका सुरू असताना तुरुंगात टाकले. तुमच्या संस्कृती आणि समाजावर भाजप आणि आरएसएस सतत हल्ला करत आहे. त्यामुळे याविरोधात आदिवासींनी आवाज उठवायला हवा, असं प्रियांका गांधींनी म्हटले.

हे देखील वाचा : नरहरी झिरवाळांनी अखेर ‘त्या’ फोटोबाबत दिले स्पष्टीकरण; म्हणाले,”मी शरद पवार गटासोबत…”

पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणतात मी एकटा भ्रष्टाचाराविरोधात लढत आहे. त्यामुळे हे लोक मला शिव्या देतात. जेव्हा जेव्हा ते प्रचारासाठी येतात आणि बोलतात तेव्हा तेव्हा ते लहान मुलांसारखे रडतात. सत्तेची सर्व साधने मोदींकडे आहेत. मग ते एकटे कसे लढत आहेत? पंतप्रधान मोदींनी गेल्या दहा वर्षांत काय केलं? जे काँग्रेसने निर्माण केलं ते मोदींनी त्यांच्या उद्योगपती मित्रांना विकले, असे म्हणत प्रियांका गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.

तसेच मोदींनी राज्यात मोठ्या उद्योपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ केले आहे. त्यामुळे जोपर्यंत आवाज बंद होत नाही आणि सरकार बदलत नाही तोपर्यंत बोलत राहणार आहे. कॉंग्रेस लोकसभा निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करणार आहे. यामधील प्रमुख आश्वासने असलेली २५ लाखापर्यंतचा मोफत उपचार, कुटुंबातील एका महिलेच्या खात्यात वर्षाला एक लाख रुपये, पदवीधरांना नोकरीचे दिलेले आश्वासन, ही सर्व आश्वासने पूर्ण करणे हीच काँग्रेसची खरी गॅरंटी आहे, असेही प्रियांका गांधी म्हणाल्या.

हे देखील वाचा : Loksabha Election 2024 : चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार; अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या