Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रSSC HSC Exam : दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेपासून परीक्षा...

SSC HSC Exam : दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून परीक्षा होणार सुरु

पुणे | Pune

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (State Boards of Secondary and Higher Secondary Education) फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेचे (10th-12th Exam) संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून (February) तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून (March) सुरू होणार आहे.

- Advertisement -

Chandrashekhar Bawankule: “…तर ईट का जवाब पत्थर से देऊ”; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य सविस्तर वेळापत्रक देण्यात आले आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या (Students) मनावरील ताण कमी करण्याच्या हेतूने लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक (Anuradha Oak) यांनी स्पष्ट केले. मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी असल्याचेही ओक यांनी सांगितले.

SSC-HSC Result : दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; कुठे पाहाल निकाल?

तसेच परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉटस्‌ॲप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहनही राज्य शिक्षण मंडळाने केले आहे.

Neeraj Chopra : “मी स्वत:ला…”; सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राची पहिली प्रतिक्रिया

तर प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्र्यपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येईल. तसेच या वेळापत्रकांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे (Divisional Board) व राज्य मंडळाकडे १५ दिवसाच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात. त्यानंतर आलेल्या सूचनांवर विचार केला जाणार नाही, असे ओक यांनी सांगितले आहे.

Sanjay Raut : ‘इंडिया आघाडी’चा लोगो कसा असणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

दरम्यान, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत दहावी-बारावीची लेखी परीक्षा घेण्यात येते. त्यातच आता फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षेचा कालावधी राज्य मंडळाने जाहीर केला आहे. त्यानुसार बारावीची (सर्वसाधारण, द्विलक्षी विषय आणि व्यवसाय अभ्यासक्रम) परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे. तर दहावीची परीक्षा १ ते २२ मार्च २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Chhagan Bhujbal : बीडमध्ये भुजबळांवर भाषण आवरतं घेण्याची वेळ, नेमकं काय घडलं?

- Advertisment -

ताज्या बातम्या