Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्याशक्तिपीठ चित्ररथाचे गडावर संचलन

शक्तिपीठ चित्ररथाचे गडावर संचलन

सप्तशृंगीगड । वार्ताहर Saptshrungi Gad

26 जानेवारीला दिल्लीला राजपथावर प्रजासत्ताकदिन संचालनात सहभागी झालेला महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणारा महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठ प्रदर्शित करणार्‍या चित्ररथाने राष्ट्रीयस्तरावर द्वितीय पारितोषिक प्राप्त करून महाराष्ट्राच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा खोवला. हाच चित्ररथ गडावरील भगवतीचे प्रतिबिंब सादर करणार असल्याचे त्याचे आज गडावर आगमन होऊन भाविकांच्या गर्दीत उत्साहात संचलन झाले.

- Advertisement -

महाराष्ट्रात सर्व मूळ साडेतीन शक्तिपीठांवर चित्ररथाचे संचलन करण्याचे राज्य शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने पूर्वनिर्धारित केलेल्या नियोजनानुसार हा चित्ररथ हा शक्तिपीठ श्री क्षेत्र माहूर येथील रेणुका माता, तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी व कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी या साडेतीन शक्तिपीठांपैकी तीन पिठांवर संंचलन करून दि. 16 रोजी श्री क्षेत्र सप्तशृंगगड या आद्य स्वयंभू शक्तिपीठावर मुक्कामी आला होता.

चित्ररथासोबत असलेली माहिती संंचालनाय विभागाचे पदाधिकारी व कार्यालयीन कर्मचारी, तालुका प्रशासन यांच्यासोबत श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड, स्थानिक ग्रामस्थ व भाविकांनी संयुक्तिक प्रयत्नातून भव्यदिव्य अशी चित्ररथाची मिरवणूक आज सप्तशृंगी गडावर काढली. चित्ररथ शिवालयतीर्थ येथे आला असता शिवतीर्थाच्या जलाने त्याच्या चक्रावर जलाभिषेक करत माजी तहसीलदार बंडू कापसे, विश्वस्त अ‍ॅड. ललित निकम, विश्वस्त मनज्योत पाटील, विश्वस्त भूषणराज तळेकर, सहा. संचालक सांस्कृतिक कार्य विभाग, पुणे सुनीता आसवले, जयेश हाटले,

कीर्तिध्वजाचे मानकरी एकनाथ गवळी, विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, अधीक्षक प्रकाश जोशी, सरपंच रमेश पवार, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तथा उपसमिती सदस्य अजय दुबे, उपसमिती सदस्य बाळकृष्ण व्हरगिल, राष्ट्रीय स्वयंसेवक दलाचे अभिषेक दुबे, ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी, संदीप बेनके, टायगर ग्रुपचे अर्जुन काळे, माजी सरपंच जीवन पवार, माजी उपसरपंच विजय दुबे आदींच्या हस्ते करण्यात आली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

शिवालय तीर्थावर झालेल्या विधिवत पूजेनंतर फटाक्यांची आतषबाजी, रस्त्याच्या दुतर्फा रांगोळीची आकर्षक मांडणी, दुर्गम भागातील सांस्कृतिक वाद्य पावरी, सनई, संबळ, डफ, ढोल, ताशे तसेच डीजे यांच्यातून निर्मित झालेले स्वर आणि चित्ररथासमोर श्रद्धेपोटी नाचत नाचत सप्तशृंगी देवीच्या जयघोषात लीन झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या