Saturday, May 18, 2024
Homeनंदुरबारनूपुर शर्मांविरुद्ध घोषणाबाजी

नूपुर शर्मांविरुद्ध घोषणाबाजी

नवापूर Navapur । श.प्र.-

नूपुर शर्मा (Nupur Sharma) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ (protest of the controversial statement) त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी (Sloganeering) करुन जिल्हाधिकार्‍यांच्या जमावबंदी मनाई आदेशाचे उल्लंघन (Violation of curfew) केल्याप्रकरणी 60 जणांविरुद्ध गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे निषेधार्थ 50 ते 60 जणांनी जिल्हाधिकार्‍यांचा मनाई आदेश (Violation of curfew) असतांना बेकायदेशीर जमाव जमवून नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली.

याप्रकरणी हेकॉ नरेंद्र मानसिंग नाईक यांच्या फिर्यादीवरुन रिझान अतीक सैय्यद रा.जनता पार्क गल्ली नं. 6 नवापूर, सलाम मिरन बागवान, रा.शास्त्रीनगर नवापूर, आसीफ जुल्फेकार सैय्यद, रा. मुसलमान मोहल्ला, नवापूर, अनिशशाह रुबाब शाह रा.इस्लामपुरा, नवापूर, आदिलखान फिरोजखान पठाणरा. गढी परीसर, नवापूर, नशरु बाबु शाह रा.इस्लामपुरा नवापूर, जहांगिर सलीम काकर रा.इस्लामपुरा नवापूर, उमर नरीम मन्सुरी रा.आंबेडकर पुतळया जवळ नवापूर, अबीद पेंटर, इम्रान पटवा रा.क्रिकेट ग्राऊंड नवापूर, बिस्मीला काकर, रा.इस्लामपुरा मज्जीद समोर नवापूर, समीर मुनाफ शाह, रा.नवापूर, जावीद रशीद शाह, यजू आयुब काकर, आयान पुर्ण नांव माहीत नाही, सलमान पूर्ण नांव माहीत नाही तसेच इतर 50 ते 60 अनोळखी इसमांविरुद्ध भादंवि कलम- 143, सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई प्रविण कोळी करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या