Sunday, October 18, 2026
Homeक्राईमCrime News : सोन्याची मोहनमाळ दाखवून व्यावसायिकाची लाखाची फसवणूक

Crime News : सोन्याची मोहनमाळ दाखवून व्यावसायिकाची लाखाची फसवणूक

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

खोदकाम करताना मोठ्या प्रमाणात सोने सापडल्याचे सांगून दोन अनोळखी इसमांनी व्यावसायिकाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सोन्याची असल्याचे भासवून पिवळ्या धातूची मोहनमाळ देत त्याच्याकडून एक लाख रूपयांची रोकड घेऊन दोघे पसार झाले. हा प्रकार आनंदऋषी मार्गावरील पॉलिटेक्निक कॉलेजसमोर, परंपरा हॉटेलजवळील बालाजी उडपी सेंटर येथे सोमवारी (21 सप्टेंबर) घडला. सायंकाळी मोहनमाळ खोटी असल्याचे सोनाराने सांगितल्यानंतर फसवणूक झाल्याचे उघडकीस आले.

- Advertisement -

याप्रकरणी सुरेश खुसरू चिपोले (वय 43, रा. संकल्प कॉलनी, नागरदेवळे, बुर्‍हाणनगर, अहिल्यानगर) यांनी कोतवाली पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. चिपोले यांचा उडपी सेंटरचा व्यवसाय आहे. 15 सप्टेंबर रोजी त्यांच्या सेंटरवर एक अनोळखी इसम नाश्ता करण्यासाठी आला होता. नाश्ता केल्यानंतर त्याने जुन्या पैशांची काही नाणी चिपोले यांना दाखवली. तसेच, आपल्याकडे अशा प्रकारची अनेक सोन्या-चांदीची नाणी असल्याचे सांगून त्यांना हवी असल्यास संपर्क करण्यास सांगितले. सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास चिपोले यांनी संबंधित इसमाच्या मोबाईलवर फोन करून पैशांची व्यवस्था झाल्याचे सांगितले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तो इसम आणखी एका साथीदारासह उडपी सेंटरवर आला.

दोघांनी चिपोले यांच्याकडे पैसे असल्याची विचारणा केली. त्यावर चिपोले यांनी आपल्याकडील एक लाख रुपयांची रोख रक्कम दाखवून त्यांच्याकडील सोने दाखविण्यास सांगितले. सोन्याची मोहनमाळ असल्याचा विश्वास बसल्याने चिपोले यांनी त्यांना एक लाख रुपयांची रोख रक्कम दिली. पैसे मिळताच दोन्ही इसम तेथून पायी चाणक्य चौकाच्या दिशेने निघून गेले. त्यानंतर चिपोले व त्यांची पत्नी मोहनमाळ विक्री करण्यासाठी ज्वेलर्समध्ये गेल्यानंतर ती खोटी असल्याचे सांगितले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे चिपोले यांच्या लक्षात आले.

ताज्या बातम्या

कोलकाता शहरात दुर्गापूजेदरम्यान चेंगराचेंगरी; १७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

0
कोलकाता पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात दुर्गापूजेच्या उत्सवादरम्यान शनिवारी (१७ ऑक्टोबर) मोठी दुर्घटना घडली. उत्तर कोलकात्यातील चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान १७ जणांचा...