Tuesday, July 2, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे उपोषण स्थगित

मोठी बातमी! ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे उपोषण स्थगित

सरकारच्या शिष्टमंडळाची यशस्वी मध्यस्थि

जालना | jalana
OBC आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी मागच्या दहा दिवसांपासून प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषणाला बसले होते. जालन्यात वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे उपोषण सुरु होते. शनिवारी सरकारच्या शिष्ट मंडळाने त्यांची भेट घेतल्यावर लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घेतले. आंदोलनाला आलेल्या आजीच्या हातून पाणी पिऊन त्यांनी उपोषण सोडले आहे.

- Advertisement -

मंत्री छगन भुजबळ, मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, अतुल सावे, मंत्री धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर अशा १२ नेत्यांच्या मंत्र्यांनी आज लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. यावेळी बोलताना लक्ष्मण हाके यांनी बोगस कुणबी नोंदी असतील तर कारवाई करु’ असे सरकारने आश्वासन दिल्याचे सांगितले.

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्याशी माझी फोनवर चर्चा झाली. ज्यामध्ये त्यांनी दोन मुद्दे जवळ- जवळ मान्य केल्याचे सांगितले आहे. मात्र सगेसोयऱ्यांचा अध्यादेशाबाबतचा निर्णय टेक्निकल आहे. तो अध्यादेश काढण्याअगोदर सर्वपक्षीय बैठक घेतली जाईल, मग त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल,” असे लक्ष्मण हाके म्हणाले.

तसेच “बोगस कुणबी नोंदी देणारे आणि घेणाऱ्यांवर कारवाई होईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र शासनचं कुणबी नोंदी वाटत आहे, त्यामुळे या प्रश्नाबाबत माझ्या मनात संभ्रम आहे. छगन भुजबळ आणि शिष्टमंडळावर विश्वास होता, म्हणूनच आम्ही त्यांना चर्चेसाठी पाठवले. ते ओबीसी हिताचा जो निर्णय घेतील त्यावर आम्ही चर्चा करु,” असेही लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केले.

छगन भुजबळ यांची तुफान फटकेबाजी
“शरीफ है हम किसी से लड़ते नहीं. पर जमाना जानता है, किसी के बाप से डरते नहीं, अशी तुफान फटकेबाजी राज्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ​ यांनी केली. ओबीसी नेत्यांना ठरवून पाडले जात आहे. त्यामुळे यापुढे फक्त शिक्षण आणि नोकरीतच नाही तर विधानसभा आणि लोकसभेतही आरक्षण देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या