Thursday, September 19, 2024
HomeनाशिकNashik Trimbakeshwar News : तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये प्रशासनाचा चोख बंदोबस्त

Nashik Trimbakeshwar News : तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये प्रशासनाचा चोख बंदोबस्त

नाशिक | Nashik

- Advertisement -

उद्या तिसरा श्रावणी सोमवार (Shravani Monday) असल्याने त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी आजपासूनच (रविवार) त्र्यंबकमध्ये गर्दी (Crowd) वाढतांना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन आणि राज्य परिवहन महामंडळाकडून चोख नियोजन करण्यात आले आहे. तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जिल्ह्यातील वेगवेगळ्या आगारातून जादा बससेवेची व्यवस्था त्र्यंबकेश्वरसाठी करण्यात आली आहे. तर पोलिसांचाही तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : दंगल प्रकरणी ३०० जणांवर गुन्हे दाखल; २० समाजकंटक अटकेत

श्रावणात बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी भाविकांची (Devotees) मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने यंदा २७० जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. १८ ऑगस्ट रोजी सकाळी आठपासून ते १९ ऑगस्टपर्यंत वाहनतळ आणि नाशिक (Nashik) येथील नवीन सीबीएसपासून या जादा बस सुटणार आहेत.

हे देखील वाचा : Nashik Crime News : दंगलखाेर निघाला ‘एमडी’ डिलर; शहरात दाेन टाेळ्यांचे रॅकेट उघड

तसेच ज्या वाहनांना नाशिक येथून जव्हार मार्गे पालघरकडे जायचे असेल त्यांनी सातपूर-गोवर्धन मार्गे गिरणारे-वाघेरा फाटा आंबोली मार्गे वापर करावा अशी सूचना नाशिक ग्रामीण पोलीस (Nashik Rural Police) प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तर पोलीस सेवेकरिता असलेली वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका, अत्यावश्यक व आपत्कालीन सेवेची वाहने यांना हे नियम लागू राहणार नसल्याचेही पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

हे देखील वाचा : Maharashtra Weather : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने २७० जादा बससेवेचे नियोजन

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने यंदा त्र्यंबकेश्वरसाठी २७० जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. यात नाशिक ते त्र्यंबकसाठी १९०, अंबोली ते त्र्यंबकसाठी एक, पहिने ते त्र्यंबकसाठी १०, घोटी ते त्र्यंबकसाठी १०, खंबाळे ते त्र्यंबकसाठी ५० अशा २७० बसच्या माध्यमातून फेऱ्या सुरू राहणार आहेत.

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी एक हजार पोलीस असणार तैनात

तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी त्र्यंबकेश्वर येथे जवळपास एक हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये एक अप्पर पोलीस अधीक्षक, तीन पोलीस उपाअधीक्षक, १८ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ४० पोलीस निरीक्षक, ३९० पोलीस उपनिरीक्षक, १३० पुरुष अंमलदार, १३० महिला पोलीस अंमलदार आणि ४३० होमगार्ड असा एक हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.

भाविकांना पहाटेपासून मंदिर दर्शनासाठी राहणार खुले

तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्ताने त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून देणगी दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. तसेच उद्या (सोमवार) पहाटे तीन वाजेपासून भाविकांना त्र्यंबकराजाचे दर्शन घेता यावे याकरिता देवस्थान ट्रस्टने मंदिर पहाटेपासूनच खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

खासगी वाहनांना प्रवेश बंद

त्र्यंबकेश्वर परिसरात वाहनांची गर्दी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन व पोलिसांच्या वतीने खंबाळे परिसरापासून खासगी वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. तसेच भाविकांनी राज्य परिवहनच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या