Monday, June 24, 2024
Homeनगरमालमत्तेत हिस्सा मागण्याच्या कारणावरुन भावांची बहिणीस मारहाण; गुन्हा दाखल

मालमत्तेत हिस्सा मागण्याच्या कारणावरुन भावांची बहिणीस मारहाण; गुन्हा दाखल

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

- Advertisement -

आई-वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा मागण्याच्या कारणावरुन दोघा भावांसह चौघांनी महिलेस मारहाण केल्याची घटना तुक्यातील तेलकुडगाव येथे घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सुरखा शिवाजी झिरपे (वय 24) धंदा-मजुरी रा. केळवंडी ता. पाथर्डी हल्ली रा. तेलकुडगाव ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 26 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मी माझे आई-वडील यांचे तेलकुडगाव येथील घरी असताना माझ्या आई-वडिलांच्या प्रापर्टीमध्ये हिश्श्याची मागणी करेल या कारणावरुन भाऊ संदीप कुशीनाथ काळे, ज्ञानदेव श्रीधर मुंगसे, कुशीनाथ गणपत काळे व चुलती विजया विष्णू काळे यांनी मला लाथाबुक्क्याने तसेच त्यांच्या हातातील काीने मारहाण करुन तू येथे राहू नको आमचे घर सोडून निघून जा. आम्ही तुला प्रॉपर्टी देणार नाही असे म्हणून शिवीगाळ मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी वरील चौघांवर भारतीय दंड विधान कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या