Monday, November 18, 2024
Homeनंदुरबारतळवे येथे घरफोडीत दोन लाखाचा मुद्देमाल लंपास

तळवे येथे घरफोडीत दोन लाखाचा मुद्देमाल लंपास

मोदलपाडा ता.तळोदा | वार्ताहर- NANDURBAR

बंद घराचे पुढील दरवाजाचे कुलूप (breaking the lock ) तोडून चोरट्यांनी (thieves) आत प्रवेश करत कपाटातील सोन्या,चांदीचे दागिने व रोकडसह (Jewelery and cash) जवळपास दीड ते दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना तळोदा तालुक्यातील तळवे येथे गुरुवारी मध्यरात्री नंतर घडली.चोरट्यांनी आता आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविल्याने जनतेमध्ये प्रचंड भीती पसरली असून पोलिसांनी चोरट्यांचा ठोस बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.दरम्यान घटनेची खबर तळोदा पोलिसांना कळविल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.त्यांनी संपूर्ण घराची पाहणी केली होती.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, तळवे ता तळोदा येथील नारायण जगन्नाथ गायकवाड व घनश्याम जगन्नाथ गायकवाड हे दोघे बंधू आपल्या संपूर्ण कुटुंबासह मावशीचा मुलीचा लग्नासाठी घराला कुलूप लावून नवापूर येथे गेले होते.नेमकी हीच संधी साधून चोरट्यांनी बंद घराचा पुढील दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला.घरातील दोन्ही कपाटे तोडून त्यात ठेवलेले सोन्याची चैन,सोन्याची अंगठी,लहान मुलांची चांदीचे दागिने साधारण अडीच तोळ्याचे सोने व रोकड असा एकूण दीड ते दोन लाखांचा ऐवज चोरून नेला आहे.

गावातील महिला शुक्रवारी सकाळी महादेव मंदिरात पूजेसाठी जात असतांना घरातील महिलाना हाक मारली परंतु त्यांचा प्रतिसाद न मिळाल्याने त्या महिला मंदिरात निघून गेल्या.त्यानंतर एका महिलेने घर उघडे दिसत असल्याचे लक्षात आल्या नंतर घरात डोकावून पाहिले मात्र कोणीच दिसून आले नाही. मात्र घरातील दोन्ही कपाटातील समान अस्त व्यस्त पडल्याचे चित्र दिसले.त्यांनी शेजारचा व्यक्तीस चोरीचा हा प्रकार सांगितला.गावातील पोलिस पाटलाने पोलिसांना कळविल्या नंतर दोन पोलिस व महिला पोलिस घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी संपूर्ण घराची पाहणी केली.

दरम्यान बाहेर गावी गेलेले कुटुंब देखील घरी आले.त्यांनी दागिन्यांची व रोकडाची चौकशी केली.दागिने,रोकड लंपास झाल्याचे त्यांचा लक्षात आले. दरम्यान याप्रकरणी घर मालक नारायण गायकवाड यांनी पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदविला आहे. तथापि आता चोरट्यानी आपला मोर्चा ग्रामीण भागात वळवल्याने शिवाय गावातील मध्यबागी असलेल्या गल्लीतील बंद घर फोडल्याने ग्रामीण जनतेमध्ये प्रचंड भीती पसरली असून पोलिसांनी चोरट्यांचा ठोस बंदोबस्त करावा.अशी मागणी जोर धरू लागली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या