Friday, September 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमुंबईतील आठ रेल्वे स्थानकांच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर

मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर

- Advertisement -

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

मुंबईतील आठ उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या नामांतराचा प्रस्ताव मंगळवारी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात येणार असून केंद्राच्या मान्यतेनंतर आठ रेल्वे स्थानकांना नवे नाव मिळेल.

सार्वजनिक बांधकाम मंत्री (उपक्रम) दादा भुसे यांनी आज विधानसभेत मध्य रेल्वेवरील करीरोड स्थानकाचे नाव लालबाग, सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचे डोंगरी, पश्चिम रेल्वेवरील मरीन लाईन्सचे मुंबादेवी, चर्नीरोडचे गिरगाव, कॉटनग्रीनचे काळाचौकी, सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचे डोंगरी, डॉकयार्ड रोडचे माझगांव आणि किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाचे नाव तीर्थंकर पार्श्वनाथ असे करण्याचा ठराव मांडला. या ठरावावर चर्चा न होता तो एकमताने मंजूर करण्यात आला.

दरम्यान, या ठरवाला पाठिंबा देताना काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी दादर रेल्वे स्थानकाचे नामांतर चैत्यभूमी करण्याची मागणी जनतेकडून होत आहे, याकडे सरकारचे लक्ष वेधत ही मागणी सरकार मान्य करणार काय? असा सवाल केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या