Monday, August 31, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदाढेगावच्या वालदेवी नदीवरील पुलासाठी तातडीने प्रस्ताव - मंत्री गिरीश महाजन यांचे आश्वासन

दाढेगावच्या वालदेवी नदीवरील पुलासाठी तातडीने प्रस्ताव – मंत्री गिरीश महाजन यांचे आश्वासन

- Advertisement -

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मनपा प्रभाग क्र. ३१ मधील दाढेगाव–पाथर्डी मार्गावरील वालदेवी नदीवरील धोकादायक पुलाच्या प्रश्नावर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने कार्यवाहीचे आश्वासन दिल्याची माहिती भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष अमित जाधव यांनी दिली.

या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पूरस्थितीत अनेक अपघात घडले असून आतापर्यंत सुमारे २४ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. पशुधनाचीही मोठी हानी होत असल्याचे त्यांनी सांगितले.

सोबत ही बातमी देखील वाचा दाढेगाव पुलावर दुर्दैवी घटना; दुचाकीसह चालक पुराच्या पाण्यात गेला वाहून

शुक्रवारी सायंकाळी एक दुचाकीस्वार पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानंतर एनडीआरएफकडून शोधमोहीम सुरू आहे.या पार्श्वभूमीवर अमित जाधव यांनी ग्रामस्थांसह गिरीश महाजन यांची भेट घेऊन निवेदन दिले. महाजन यांनी तत्काळ एनडीआरएफशी संपर्क साधत महापौर हिमगौरी आडके, आयुक्त मनीषा खत्री आणि स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांना पुलाची पाहणी करून नवीन पुलाचा प्रस्ताव तयार करण्याचे व निधी उपलब्ध करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी पंढरी भोर, संदीप भोर, रवि सोनवणे, आनंद जाधव, भाऊसाहेब भोर, कार्तिक भोर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

ताज्या बातम्या

‘सिंहस्थ संस्कृती’ प्रदर्शनाचा समारोप; दुर्मीळ छायाचित्रांतून उलगडला नाशिकच्या सिंहस्थ परंपरेचा इतिहास

0
नाशिक : जिमाका वृत्तसंस्था Nashik नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आठवणी जपणाऱ्या ‘सिंहस्थ संस्कृती’ या तीन दिवसीय प्रदर्शनाचा रविवारी समारोप झाला. रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्स...