Saturday, November 23, 2024
HomeनाशिकNashik News : बेकायदेशीर मुरुम उत्खनन भोवणार? प्रांत अधिकार्‍यांकडून कारवाईची सूचना

Nashik News : बेकायदेशीर मुरुम उत्खनन भोवणार? प्रांत अधिकार्‍यांकडून कारवाईची सूचना

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

दिंडोरी तालुक्यातील सोनजांब येथील सरकारी जागेवर अवैधपणे बेकायदेशिर उत्खनन होऊन शासनाचा कोट्यावधींचा महसूल बुडत असल्याबाबत दैनिक देशदूतने याबाबत वृत्त प्रसिध्द होताच प्रांत अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांच्याकडून तहसिलदारांना सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. या पार्श्‍वभूमीवर मंडल अधिकार्‍यांनी जागेवर जाऊन पंचनामा करुन नुकसानीचा अहवाल बनवला आहे. त्यामुळे आता पुढे काय कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : पहिने धबधब्यावर तरुणांमध्ये ‘दे दणादण’; Video व्हायरल

सोनजांब येथील गट नं. ५०९ हा साधारणत: ५ हेक्टरचा सरकारी गट आहे. या गटातून बेकायदेशिरपणे मुरुम उत्खनन केले जात असल्याचे निदर्शनास आले. दिवसाढवळ्या ट्रॅक्टर, जेसीबी आदी यंत्रांच्या साह्याने बेकायदेशिरपणे मुरुम वाहतूक केली जात होती. यासंदर्भात मंडल अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार करण्यात येवूनही त्यांनी डोळेझाक केली असल्याची तक्रार सोनजांब येथील ग्रामस्थांनी केली होती. मंडल अधिकार्‍यांच्या कारभारावरच संशय व्यक्त केला जात असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

हे देखील वाचा : Nashik News : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत जिल्ह्यात ‘इतक्या’ महिलांचे अर्ज प्राप्त

त्यानंतर प्रांत अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी याबाबत तत्काळ तहसिलदारांना सूचना देऊन चौकशी करण्यास सांगितले. मंडल अधिकारी यांनी तातडीने उत्खनन झालेल्या त्या ठिकाणी पोहचून प्रत्यक्ष पाहणी केली. उत्खनन झालेल्या जागेचा स्थळ पंचनामा करण्यात आला. यावेळी लांबी, रुंदी व खोली मोजुन साधारणत: किती उत्खनन झाला असेल याचा अंदाज प्रशासनामार्फत लावला जात आहे. त्यामुळे सदर बेकायदेशिर उत्खननावर कोणावर कारवाई होवून संबंधितांला किती दंड होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा : NashiK Crime News : ‘त्या’ खून प्रकरणातील सराईत आठवडा उलटूनही सापडेना

दिंडोरी तालुक्यातील सोनजांब येथील बेकायदेशिर उत्खननाबाबत प्रसार माध्यमाव्दारे बातमी समजली. त्यावर संबंधित तहसिलदार यांच्या अखत्यारीत विषय असल्याने याची चौकशी करुन कारवाई करण्याचे सूचना केल्या आहेत. जे दोषी असतील त्यांच्यावर नक्की कारयदेशिर कारवाई होईल.

आप्पासाहेब शिंदे, प्रांत अधिकारी दिंडोरी

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या