Thursday, May 15, 2025
Homeधुळेप्रांताधिकार्‍यांचा भल्या पहाटे ओव्हरलोड वाळू वाहतूक करणार्‍यांना दणका

प्रांताधिकार्‍यांचा भल्या पहाटे ओव्हरलोड वाळू वाहतूक करणार्‍यांना दणका

दोंडाईचा dondaicha । श.प्र.

- Advertisement -

गुजरात (Gujarat) राज्यातून वाळुच्या ओव्हरलोड (Sand overload) भरून जाणार्‍या वाहनांवर (vehicles) काल भल्या पहाटे प्रांताधिकारी प्रमोद भामरे (District Magistrate Pramod Bhamre) यांनी कारवाई (Action taken) केली. तपासणीत तीन वाहने ओव्हरलोड वाळुने भरलेले आढळून आल्याने त्यांच्याकडून पावणे चार लाखांचा दंड वसूल (fine of Rs four lakhs)करण्यात आला. तर एक वाहन अती ओव्हरलोड असल्याने त्या वाहनाला जादा दंड आकारण्यात आला. तो दंड जागेवर न भरल्यामुळे वाहन जप्त करून दोंडाईचा अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात उभा करण्यात आला आहे.

सत्तेच्या लोभापायी उध्दव ठाकरेंनी त्यागले हिंदुत्व

महाराष्ट्रात वाळूचा ठेका दिला न गेल्याने वाळू उपसा बंद आहे. त्यामुळे गुजरात राज्यातून वाळूची ओव्हरलोड वाहने नाशिक, मुंबई, पुणे जात असल्याची गोपनिय माहिती शिरपूर प्रांताधिकारी प्रमोद भामरे यांना मिळाली होती.

एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र पुन्हा वरणगावला येणार VISUAL STORY : माझ्या जगण्याचं कारण…” दिवंगत बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्माची शेवटची पोस्ट

त्यानुसार प्रांताधिकारी प्रमोद भामरे यांनी काल भल्या पहाटे शिंदखेडा-दोंडाईचा परिसरात फेरफटका मारला असता गुजरातकडून एमएच 41 3902, एमएच 41 एफएम 8172 व एमएच 18 पी 1951 या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. एक वाहनाने दंड न भरल्याने अपर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.

दोंडाईचा शहरासह परिसरात अवैध गौण वाहतूक सुरू आहे. प्रांताधिकारी भल्या पहाटे कारवाई करतात. मग मंडळाधिकारी व तलाठी यांना ही बाब समजत नसेल का, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

आक्षेपार्ह वक्तव्याने जळगावात तणाव

ही कारवाई प्रांताधिकारी प्रमोद भामरे, मंडळाधिकारी अनिल भामरे, पी.पी.ढोले, दोंडाईचा तलाठी संजीव गोसावी, दीपक भगत, सुभाष कोकणी, चालक मुकेश विसपुते आदींनी केली आहे.

धुळ्यात वकीलाकडे धाडसी घरफोडी

कारवाईत सातत्य असावे

दोंडाईचा शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैद्य गौणखनिजाची वाहतूक होते. मात्र संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याने अनेक माफिया हे गब्बर होत आहेत. रात्री बेरात्री गौण खनिजाची चोरटी वाहतूक होत असल्यााने शासनाचा महसूल देखील बुडत आहे. त्यामुळे वाळु माफियांवर कायदेशीर कारवाई करण्यासह त्यात सातत्य असणे गरजेचे आहे.

गौणखनिजाची विनापरवाना वाहतूक केल्यास कारवाई दोंडाईचा शहराकडून ओव्हरलोड वाळू वाहतूक जोमात सुरू असल्याचे कळाले होते. स्थानिक शहरासह परिसरात देखील रात्री अपरात्री अवैध गौणखनिजाची वाहतूक होत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार ओव्हरलोड वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कोणीही विना परवाना गौण खनिज वाहतूक करू नये. तसे आढळल्यास कारवाई केली जाईल.

-प्रमोद भामरे, प्रांताधिकारी, शिरपूर

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra News : सीसीटीव्ही लावा, सेवकांची मद्य चाचणी करा; राज्य सरकारची...

0
मुंबई | Mumbai  महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) लहान मुलांचे लैंगिक शोषण थांबवण्यासाठी राज्यातील शाळांसाठी नवी नियमावली जाहीर केली. त्यानुसार राज्यातील प्रत्येक शाळांत सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे...