Friday, January 9, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमहापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर

महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर

राज्य सरकारकडून अधिसूचना जारी

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित महापालिका क्षेत्रात त्यादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.

YouTube video player

ही अधिसूचना सर्व विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही सार्वजनिक सुट्टी संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदारसंघाबाहेर कामानिमित्त असलेल्या मतदारांनाही लागू राहणार आहे. महापालिका क्षेत्रांतील केंद्र सरकारची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आणि तत्सम आस्थापनांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या महापालिकांमध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मिरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे. मतदारांनी मतदानासाठी लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Bus Accident : भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली; ८...

0
दिल्ली । Delhi हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यामध्ये शुक्रवारी दुपारी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. हरिपुरधार येथे एक खासगी बस नियंत्रणाबाहेर जाऊन थेट खोल...