Wednesday, January 28, 2026
Homeनगरजुने पुनतगाव येथे भरदिवसा घरफोडी

जुने पुनतगाव येथे भरदिवसा घरफोडी

सव्वाआठ तोळ्याचे दागिने व 60 हजार रुपये लंपास

पाचेगाव फाटा |वार्ताहर| Pachegav Phata

नेवासा तालुक्यातील जुने पुनतगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार नंदराज दगडू शिंदे यांच्या राहत्या घरात भरदिवसा घरफोडीची घटना घडली. या घटनेत सव्वाआठ तोळे सोन्याचे 11 दागिने व 60 हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरीस गेला. गावातील वस्तीवर असलेल्या धार्मिक कार्यक्रमासाठी घरातील सर्व मंडळी दरवाजाला कुलूप लावून गेले होते. दुपारी त्यांची पत्नी, सून व मुलगा घराकडे आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.

- Advertisement -

या चोरीत दीड तोळ्याचे सोन्याचे एक मिनीगंठण, एक तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण, अर्धा तोळ्याची वेल, 4 ग्रॅमचे डोरले, 13 ग्रॅमचे मिनी गंठण, एक ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा, 6 ग्रॅमची सोन्याची पोत, एक तोळ्याचे झुबे, अर्धा तोळ्याचे सोन्याचे वेल, 7 ग्रॅमची सोन्याची पोथ, 6 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पळ्या व मणी असे 8 तोळे 2 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्याचबरोबर 60 हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी चोरुन नेले.

YouTube video player

अज्ञात चोरट्यांनी 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेदरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने माझे पुनतगाव शिवारातील शेत गट नंबर 20/2 मधील शेत वस्ती मधील घराचे पाठीमागील उघड्या असलेल्या घराच्या दरवाज्यातून घरात प्रवेश करुन घरातील लोखंडी पेटीचे कोंयंडा कुलूप तोडुन तसेच लोखंडी कपाटातून सोन्याचे दागीने व रोख रक्कम चोरुन नेली. या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 303 (2) या कलमानुसार नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल पवार, बिट हवालदार आप्पासाहेब वैद्य हे पुढील तपास करीत आहे. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर भरदिवसा चोरीचा प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात या गावात पाहिल्यादाच दिवसा चोरीमुळे चोर देखील माहितीचे व परिसरातील असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मागील 10 ते 12 दिवसांपूर्वी नंदराज शिंदे यांनी तालुक्यातील दोन पतसंस्थेत गहाण ठेवलेले आपले सोने सोडून आणले होते. तसेच शेतातून वेचून आणलेला साडेसहा क्विंटल कापूस दोन दिवसांपूर्वीच मार्केट मध्ये विकला होता. त्यामुळे सोनं सोडून आणणे, कापूस विकणे व घरात कोणी नाही. या सर्व गोष्टी परिसरातील चोरांवर संशय घेण्यास भाग पाडत असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. त्यात कोणत्या गोष्टी कुठे ठेवल्या हे माहिती असल्यामुळे चोरट्यांनी इतर गोष्टीला हातही लावला नाही.

ताज्या बातम्या

मोठी बातमी! भीषण विमान अपघातात अजित पवारांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा

0
बारामती | Baramati उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला आहे. ताज्या अपडेट्सनुसार या विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्याचा आणि आतापर्यंत...