Friday, May 3, 2024
Homeनाशिकबेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सव्वा महिन्यापासून नाशिकमध्ये टोईंग ( Towing action in Nashik ) सुरू झाले आहे. यातून पोलीस प्रशासनाने 14 लाखांचा दंड बेशिस्त वाहनधारकांकडून आकारला आहे. त्यात 3,312 दुचाकी तर 1,723 चारचाकी वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लागावी म्हणून पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेकडून गेल्या 7 जुलैपासून शहराच्या महत्वाच्या रस्त्यांवर ‘नो पार्किंग झोन’मध्ये लावलेली वाहने उचलण्याची माहीम राबवण्यात आली. शहरातील सीबीएस व शालिमार भागातील 10 ठिकाणे, महामार्ग बस स्थानकासमोरील मुख्य रस्ता, उंटवाडी मॉल परिसर, रविवार कारंजा आणि पंचवटीतील 5 नो पाकिंगच्या ठिकाणी वाहने लावणार्‍यांवर ही दंडात्मक कारवाई होत आहे.

4 टेम्पोंसह 3 क्रेन व्हॅनच्या सहाय्याने रस्त्यांवरील नो-पार्किंग झोनमध्ये उभी केलेली वाहने वाहतूक शाखेकडून उचलली जात आहेत. टोईंग केलेली वाहने शरणपूररोडवरील वाहतूक शाखेच्या कार्यालयात जमा केली जात आहेत. तेथे दंडाची रक्कम भरून वाहनमालकाला त्याचे वाहन ताब्यात दिले जात आहे. वाहन उचलताना वाहनमालक जागेवर आल्यास संबंधित सेवकांसह वाहनावरील वाहतूक पोलीस संबंधितांना शासकीय दंडाची रक्कम घेऊन तत्काळ त्याचे वाहन जागेवरच देत आहेत.

गेल्या 47 दिवसांत 5,035 वाहनांवर कारवाई झाली आहे. त्यात 3,312 दुचाकी तर 1,723 चारचाकी आहेत. शासकीय नियमानुसार दुचाकी आणि चारचाकीसाठी 200 रुपये दंड आहे. मात्र त्यात आता टोईंगचा खर्चही समाविष्ट होत आहे. दुचाकीसाठी हा दर 90 तर चारचाकीसाठी 350 रुपये आहे. पोलीस प्रशासनाने आतापर्यंत एकूण 14,60,150 एवढा दंड आकारला आहे. दुचाकी वाहनधारकांकडून 9,60,480 तर चारचाकीधारकांकडून 4,99,670 दंड वसूल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या