Friday, November 22, 2024
Homeराजकीयमैदानात उतरा आणि ठोका, अट फक्त एकच…; फडणवीसांचा पदाधिकाऱ्यांना 'फ्री हँड'

मैदानात उतरा आणि ठोका, अट फक्त एकच…; फडणवीसांचा पदाधिकाऱ्यांना ‘फ्री हँड’

पुणे । Pune

पुण्यात बालेवाडीत आज भाजपचे अधिवेशन सुरु आहे. गृहमंत्री अमित शाह हे या अधिवेशनात भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारा आहेत. यावेळी महाराष्ट्रातून भाजपचे नेते उपस्थित राहिले आहेत. यावेळी उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. विरोधकांना उत्तर देण्यासाठी आदेशाची वाट पाहू नका. मैदानात उतरा आणि ठोकून काढा’. कार्यकर्त्यांनी आदेश देताना सावधगिरी बाळगण्याची सूचना देखील फडणवीस यांनी केल्या.

- Advertisement -

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, आज तुम्हाला परवानगी देतो. ज्याला बॅटिंग करायची आहे, त्याने करावी. मैदानात उतरा. पण अट एकच आहे. हीट विकेट व्हायचं नाही. जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे सेल्फ गोल करायचा नाही. काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात. ते असं काही बोलतात की चार दिवस त्याचीच उत्तरं द्यावी लागतात. बाकी आदेश विचारू नका. मैदानात उतरा आणि ठोकून काढा. तुम्हाला खोटं बोलायचंच नाही. खरं बोलायला विचार करावा लागत नाही. त्यांना खोटं बोलायचं आहे. तुम्हाला खरं बोलायचं आहे. तुम्ही सगळे मैदानात उतरले पाहिजेत, असा आदेशच फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.

हे ही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत झळकले हरवलेले बाबा; विरोधकांचं टीकास्त्र

तसेच, आज गुरुपौर्णिमा आहे. भगवा ध्वज आपला गुरु आहे, हा ध्वज शिवाजी महाराजांचा आहे. त्याचा आपण मान राखला पाहिजे. २०१३ ला आपण असच अधिवेशन घेतलं आणि १४ निवडून आलो. या विधानसभेला महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार मी लिहून देतो. हा भाजपचा विचार गावपर्यंत पोहोचवणावर आहे. २०१९ च्या निवडणुकीत लोकांचा पाठिंबा बघितला, २०१४ लाही जनता आपल्या पाठीशी होती. २०१४ ची निवडणूक ती पक्षांविरोधात लढत होतो. फेक नॅरेटिव्ह ला आम्ही ताकद दाखवणार आहोत. आपला परावभ ०.३ टक्क्याने झाला. आपल्या १७ आणि त्यांच्या ३१ जागा आल्या आहेत. आता फक्त थोडी मेहनत करण्याची गरज आहे. त्यावेळी फेक नॅरेटिव्ह येत होता. त्याला उत्तर देऊ शकलो नाही. म्हणून कमी जागा आल्या आहेत.

हे ही वाचा : तुमचा भंपकपणा आम्ही उघडा करणार; भाजपच्या दरेकरांचा जरांगेंना इशारा

आरक्षणाची सीमा वाढवण्याचा प्रयत्न अटलजींनी केला. मोदींनी देखील सीमा वाढवली. संविधानाचे आरक्षण सामान्य माणसासाठी आहे. संविधान बदलणार हा फेक नॅरेटिव्ह चालवण्यात आला. आवास योजना, मेट्रो, जल शिवार युक्त योजना त्यांनी बंद केल्या. आम्ही लाडकी बहीण योजना सुरु केली. बहिणीचा सन्मान करण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली. या योजनेच्या विरोधात ते कोर्टात चालले. आपली योजना आहे ती जमिनीवर उतरली पाहिजे. महाविकास आघाडीचे लोक आहेत. चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरून घेतले जात आहेत. आपल्याला हि योजना अंमलात आणायची आहे. तुम्ही व्यवस्थितरित्या फॉर्म भरा. आपल्या कार्यकर्त्यांनी लोकांना मदत करा. असेही ते म्हणाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या