Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रधक्कादायक! शाळेतच १२ वर्षीय मुलाकडून ७ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

धक्कादायक! शाळेतच १२ वर्षीय मुलाकडून ७ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

पुणे | प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील एका शाळेत ७ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. एका १२ वर्षांच्या मुलाने शाळेच्या बाथरूममध्ये ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याचं सांगण्यात येत आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणाची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मुलीच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

- Advertisement -

मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर बुधवारी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आलं. अल्पवयीन मुलाविरुद्ध एफआयआर दाखल केलेल्या पुणे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, ही घटना दोन दिवसांपूर्वी शाळेच्या आवारातील बाथरूममध्ये घडली होती. मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात संपर्क साधून माहिती दिली. आता या १२ वर्षीय मुलावर बलात्काराचा आरोप असून त्याला बाल न्याय मंडळाकडे पाठवण्यात आलं आहे. हे प्रकरण जिल्हा बालकल्याण समितीसमोर मांडण्यात आलं आहे.

Accident News : समृध्दी महामार्गावर विचित्र अपघात, आई-वडिलांसह १८ महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू

एका अधिकाऱ्याने सांगितलं की, मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना समुपदेशनाचा आधार दिला जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी १२ वर्षीय मुलाविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलमांनुसार बलात्कार आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

साईंच्या दर्शनबारी उद्घाटनावरून विखे- थोरातांमध्ये जुंपली

- Advertisment -

ताज्या बातम्या