Friday, January 23, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यात भरचौकात गुंडाचा दगडाने ठेचून खून, पाच अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पुण्यात भरचौकात गुंडाचा दगडाने ठेचून खून, पाच अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे । प्रतिनिधि

कुख्यात गुंड राजू शिवशरण (वय ३६, रा. रामटेकडी, हडपसर) याचा मध्यरात्री किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलांनी डोक्यात दगड घालून खून केला आहे.

- Advertisement -

ही घटना आज (शुक्रवारी) पहाटे दीडच्या सुमारास हडपसर मधील राम टेकडी येथील वंदे मातरम चौकात घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

YouTube video player

हे ही वाचा : विधानसभा निवडणुकीचा धुराळा उडणार; ‘या’ तारखांपासून महायुती, महाविकास आघाडीचा प्रचाराचा नारळ…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशरण आणि अल्पवयीन मुलांमध्ये दारूसाठी पैसे मागितल्याने वाद झाला. शिवशरण आणि मुले दारू प्यायली होती. वादातून मुलांनी शिवशरणला मारहाण करण्यास सुरुवात केली. मुलांनी शिवशरणच्या डोक्यात दगड घातला, तसेच त्याच्या डोक्यात दारूची बाटली फोडली.

हे ही वाचा : राज्यसभेत सभापती अन् जया बच्चन यांच्यात रंगलं शाब्दिक द्वंद्व; नेमकं काय झालं…

गंभीर जखमी झालेल्या शिवशरणला पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. शिवशरण याच्याविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. शिवशरण आणि अल्पवयीन मुले ओळखीचे आहेत. पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे ही वाचा : गुलाबी स्वप्न दाखवत नाही, तर प्रत्यक्षात काम करून अमलात आणतो :…

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी विशेष हेल्पलाईन नंबर सुरु – मंत्री...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी ई केवायसी पूर्ण केल्यानंतरही अनेक लाभार्थ्यांना हप्ता न मिळणे, ई केवायसी पूर्ण न...