Friday, January 23, 2026
HomeनगरAhilyanagar : पुण्यातील कोट्यवधींच्या ड्रग्स तस्करीचे धागेदोरे अहिल्यानगर पोलीस दलापर्यंत

Ahilyanagar : पुण्यातील कोट्यवधींच्या ड्रग्स तस्करीचे धागेदोरे अहिल्यानगर पोलीस दलापर्यंत

पोलीस कर्मचारी संशयाच्या भोवर्‍यात || चौकशीसाठी घेतले ताब्यात

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) व शिरूर पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत शिरूर शहरात 1 किलोहून अधिक मेफेड्रोन (एमडी) अंमली पदार्थासह गॅरेज चालकाला अटक करण्यात आली असून या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचा अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील एका पोलीस कर्मचार्‍याशी निकट संबंध असल्याची गंभीर माहिती समोर आल्याने पोलीस खात्यातच खळबळ उडाली आहे. त्या पोलीस कर्मचार्‍याला चौकशीसाठी पुणे ग्रामीण एलसीबीने मंगळवारी (20 जानेवारी) ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधात कठोर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी दिले होते. त्यानुसार 17 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरूर परिसरात गस्त घालत असताना अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर शहरातील डंबेनाला परिसरात राहणारा गॅरेज चालक शादाब रियाज शेख (वय 41) हा बाबुरावनगर परिसरातील मोकळ्या मैदानात एमडी विक्रीसाठी येणार होता. उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर विभाग यांची परवानगी घेऊन 18 जानेवारी रोजी मध्यरात्री छापा टाकण्यात आला.

YouTube video player

छाप्यात आरोपीच्या ताब्यातून 1 किलो 52 ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन (एमडी) व एक दुचाकी असा सुमारे 2 कोटी 10 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या कारवाईनंतर मिळालेल्या अधिक तपासात धक्कादायक बाब समोर आली असून, अटक करण्यात आलेल्या शादाब शेखचा अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील एका पोलीस कर्मचार्‍याशी थेट संबंध असल्याचे उघड झाले आहे. सदर कर्मचारी अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयातील एका शाखेत कार्यरत आहे. पुणे ग्रामीण एलसीबी पथकाने त्या कर्मचार्‍याला मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. ड्रग्स तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यात पोलीस दलातीलच कर्मचारी संशयाच्या भोवर्‍यात सापडल्याने अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित कर्मचार्‍याची भूमिका, आरोपीशी असलेले आर्थिक व संपर्कातील व्यवहार, तसेच ड्रग्स नेटवर्कमधील सहभाग याबाबत सखोल तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Shirdi : संरक्षण उत्पादनाचे महत्वपूर्ण केंद्र म्हणून अहिल्यानगरचे नाव जगासमोर येणार

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेतून देशाच्या संरक्षण उत्पादनाचे महत्वपूर्ण केंद्र म्हणून भविष्यात अहिल्यानगरचे नाव जगासमोर येणार असून संरक्षण क्षेत्रात प्रगती...