पुणे | Pune
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे आज (6 जानेवारी 2026) पुण्यातील वयाच्या ८२ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते काही दिवसांपासून आजारपणाशी झुंज देत होते, त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात सुरेश कलमाडी यांच्यावरती उपचार सुरू होते. आज दुपारी सुरेश कलमाडी यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.
सुरेश कलमाडी यांच्यावर गेल्या काही काळापासून दीर्घकालीन आजारामुळे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार चालू होते. मात्र आज पहाटे ३.३० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. पहाटे साडेतीनच्या सुमारास प्रदीर्घ आजारामुळे उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे त्यांची पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, जावई आणि नातवंडं असा परिवार आहे’, अशी माहिती जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
सुरेश कलमाडी यांचं पार्थिव एरंडवणेतील त्यांचं निवासस्थान ‘कलमाडी हाऊस’मध्ये दुपारी दोन वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून साडेतीनच्या सुमारास नवी पेठ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सुरेश कलमाडी यांनी आपल्या कार्यकाळात राजकीय जबाबदाऱ्यांबरोबरच भारतीय ऑलिम्पिक महासंघाचं अध्यक्षपदही भूषवले होते. याशिवाय ते प्रदीर्घ काळ पुण्यातून खासदार म्हणून निवडून जात होते. शिवाय त्यांनी अल्पकाळ रेल्वे राज्यमंत्री म्हणूनही कार्यभार पाहिला होता. विशेष म्हणजे, रेल्वे राज्यमंत्री असताना रेल्वे बजेट मांडणारे ते एकमेव राज्यमंत्री ठरले होते. पुण्यात ‘पुणे फेस्टिव्हल’ आणि ‘पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’ यांसारख्या उपक्रमांची सुरुवात करून त्यांनी शहराला एक नवी ओळख मिळवून दिली.
राजकारणात येण्याआधी पायलट म्हणून कार्यरत
पुण्याच्या राजकारणावर सुरेश कलमाडी यांनी एकेकाळी पूर्ण प्रभाव राखला होता. पण राजकारणात येण्याआधी सुरेश कलमाडी हे १९६४ ते १९७२ या काळात भारतीय हवाई दलात पायलट म्हणून कार्यरत होते. १९७४ साली ते सेवेतून निवृत्त झाले आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत झाले. तिथून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. १९९५ ते १९९६ या काळात काँग्रेसप्रणीत केंद्र सरकारमध्ये त्यांनी रेल्वे खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही कार्यभार पाहिला होता.
पुण्याचे कारभारी म्हणून ओळख
पुणे शहराच्या विकासासाठी, विशेषतः विमानतळ विकास, मेट्रो प्रकल्प आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये त्यांचा मोठा हात होता. त्यांच्या याच राजकीय वर्चस्व, प्रशासकीय पकड आणि विकासकामांच्या जबाबदारीमुळे त्यांना पुण्याचे ‘कारभारी’ म्हणून ओळखले जाऊ लागले, जणू ते शहराचे व्यवस्थापकच आहेत. क्रीडा प्रशासन: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनात त्यांची भूमिका आणि त्यानंतरचे वाद यामुळेही ते चर्चेत होते, पण पुण्याच्या संदर्भात त्यांची ‘कारभारी’ ही उपाधी स्थानिक राजकारणातून आली होती.
राष्ट्रकुल स्पर्धेवेळी भ्रष्टाचाराचे आरोप
२०१० साली दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेवेळी सुरेश कलमाडी यांच्यावर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. एप्रिल २०११ साली त्यांच्यावर दोषसिद्धीही झाली. यानंतरदेखील क्रीडा क्षेत्रात, विशेषत: ऑलिम्पिकशी संबंधित संघटनेमध्ये सुरेश कलमाडी यांचा प्रभाव पाहायला मिळत होता. २०१६ साली सुरेश कलमाडी व अभय सिंह चौटाला यांना भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या पॅनलचे आजीवन अध्यक्ष म्हणूनही नियुक्त करण्यात आलं होतं. मात्र, कलमाडी यांनी तेव्हा ही जबाबदारी नाकारली होती.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




