Tuesday, March 25, 2025
Homeमहाराष्ट्रPune Hit And Run : पुन्हा 'हिट अँड रन', चारचाकीने दुचाकीस्वाराला नेलं...

Pune Hit And Run : पुन्हा ‘हिट अँड रन’, चारचाकीने दुचाकीस्वाराला नेलं फरफटत

पुणे । प्रतिनिधि

पुण्याच्या (Pune) कल्याणीनगर (Kalyaninagar) भागात झालेले ‘हिट अँड रन’ (Hit And Run) प्रकरण ताजे असताना पुन्हा एकदा असाच प्रकार पिंपरी-चिंचवड मध्ये घडल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

एका भरधाव चार चाकीने दुचाकी चालकाला स्वाराला काही अंतरापर्यंत फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर चारचाकी चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा : पुण्यात भरचौकात गुंडाचा दगडाने ठेचून खून, पाच अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात

चारचाकी चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं आहे. बुधवारी (७ ऑगस्ट) दुपारी चार वाजताच्या सुमारास ही भयंकर घटना घडल्याची माहिती आहे. या अपघाताचं धडकी भरवणारं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

पिंपरी-चिंचवड बहगतील पिंपळे गुरव येथील मेन बस स्टॉप येथे हा भयंकर प्रकार घडला आहे. व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे एक चारचाकी चालक दुचाकी स्वाराला काही अंतरापर्यंत फरफटत नेत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा दुचाकीस्वार गाडीच्या समोरच्या चाकात अडकल्याचं दिसत आहे.

हे ही वाचा : नाशिकमध्ये दोघांना ३० लाखांचा गंडा

त्यामुळे दुचाकीस्वाराला कारने मागून धडक दिली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणात चारचाकी चालक अपघातानंत घटनास्थळावरून फरार झाला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं आणि दुचाकीस्वाराला रुग्णालयात पाठवलं.

या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, पोलिस सध्या फरार कारचारलकाचा शोध घेत आहेत.

हे ही वाचा : राज्यसभेत सभापती अन् जया बच्चन यांच्यात रंगलं शाब्दिक द्वंद्व; नेमकं काय…

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...