पुणे | Pune
पुणे शहराच्या कोंढवा परिसरात मध्यरात्री अँटी टेररिस्ट स्कॉड अर्थात एटीएसने मोठं सर्च ऑपरेशन राबवलं आहे. एटीएसने पुणे पोलिसांच्या मदतीने कोंढवा परिसरात एकाच वेळी तब्बल १८ ठिकाणी ही शोधमोहीम राबवली आहे. कोंढवा परिसरामध्ये छापेमारी सुरू असतानाच गल्लीबोळामध्ये आय लव मोहम्मदचे बॅनर झळकले आहेत, त्यामुळे छापे आणि बॅनर यांचा काही संबंध आहे का? याचाही तपास सुरू आहे, पोलीस त्या दृष्टिकोनातूनही तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा भागातील काही ठिकाणी अनधिकृतरित्या राहणारे लोक दहशतवादी कारवायांशी संबंधित असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. याच संशयावरून एटीएस आणि पुणे पोलिसांनी कोंढवा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत.
संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर एटीएससह तपास यंत्रणांनी गुरुवारी सकाळपासून कोंढव्यातील मीठानगर परिसरात छापे टाकले. या कारवाईत एटीएसने काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. मात्र पोलिसांनी याबाबत अधिकृत माहिती देण्यास नकार दिला. पोलिसांनी इतकेच पुष्टी केली आहे की, ही एक संयुक्त शोधमोहीम आहे आणि सर्व सुरक्षा यंत्रणा एकत्रितपणे काम करत आहेत.
कोंढवा परिसरात हजारांच्या जवळपास पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याच दरम्यान, दुसरीकडे गल्लीबोळांमध्ये गल्लीबोळामध्ये आय लव मोहम्मदचे बॅनर झळकताना दिसत आहेत. परिसरात पोलीस फिरत आहेत, त्याच रस्त्यांवरती दोन ते तीन ठिकाणी आय लव मोहम्मदचे बॅनर लावल्याचे निदर्शनास येत आहे. ही कारवाई आणि हे बॅनर यांचा आपापसात काही संबंध आहे का? असा सवाल देखील उपस्थित होत आहे, तसा संशय देखील व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण शोधमोहीम पूर्ण झाल्यानंतरच यासंबंधी माहिती अधिकृतरीत्या दिली जाईल. खरे तर, पुण्यातील कोंढवा परिसरात यापूर्वी देखील एटीएसने छापेमारी करत अनेकांना अटक केली होती. दोन वर्षांपूर्वीच कोंढवा परिसरातून बंदी असलेल्या एका दहशतवादी संघटनेच्या तीन सदस्यांना अटक केली होती. त्यावेळी देशातील एका मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले होते.
गुरवार मध्यरात्रीपासून कोंढव्यातील १८ ठिकाणी मोठे सर्च ऑपरेशन सुरू आहे. महाराष्ट्र पोलिस, पुणे पोलिस आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा मिळून हे संयुक्त ऑपरेशन राबवले आहे. काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. शोधमोहीम पूर्ण झाल्यानंतर तपशील अधिकृतरीत्या जाहीर केला जाईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




