पुणे | Pune
पुण्यातल्या जमीन व्यवहारासंबंधी मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्यातील बोपोडी जमीन व्यवहारात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणात अमेडीया कंपनी आणि शीतल तेजवानी यांचा संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पुण्यातील बोपोडीतील जमीन व्यवहार प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने १८०० कोटी रुपयांची जमीन ३०० कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप पार्थ पवारांवर करण्यात आला आहे. व्यवहारावर नियमाप्रमाणे सहा कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरणे अपेक्षित असताना अवघे 500 रुपये शुल्क भरण्यात आल्याचं देखील समोर आलं आहे. या प्रकरणात कुलमुख्त्यारधारक शीतल तेजवानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र आता बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणात मोठे ट्विस्ट आल्याचे पहायला मिळत आहे. बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांनी यूटर्न घेतला आहे. बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणात अमेडिया कंपनी आणि शीतल तेजवानी यांचा संबंध नाही, अशी भूमिका आता पोलिसांनी घेतली आहे.त्यामुळे आता बोपोडी जमीन प्रकरणातून शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील (अमेडिया कंपनी) यांचे नाव वगळ्यात आल्याची माहिती समोर येत आहे. एकाच एफआयआरमध्ये दोन जमिनीची प्रकरणे नमूद असल्यामुळे गोंधळ निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे, त्यामुळे आता पुणे पोलिसांकडून शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांना या प्रकरणात अप्रत्यक्ष क्लीन चीट देण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पुणे पोलीस उपआयुक्त विवेक मासाळ यांनी म्हटले की, खडक पोलिस ठाण्यातील एफआयआरमध्ये बोपोडी जागेची एक घटना आणि मुंढवा मध्ये असलेल्या एका जागेच्या संदर्भात आहे. या दोन्ही घटना वेगवेगळ्या आहेत. बोपोडी मध्ये ६ आरोपी आणि मुंढवा प्रकरणामध्ये शीतल तेजवाणी आणि दिग्विजय असे दोन आरोपी आहेत’.
दरम्यान आता बोपोडी जमीन प्रकरणातून नाव वगळ्यात आल्यानं तेजवानी यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कोरोगाव पार्क जमीन प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर बोपोडी जमीन व्यवहार उघड झाला होता, मात्र या प्रकरणात त्यांचा संबंध नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




