Saturday, October 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजबेल्टने मारहाण, जातीवाचक शिवीगाळ अन् सार्वजनिक धिंड; पुण्यात ११ पोलीसांवर गुन्हा दाखल

बेल्टने मारहाण, जातीवाचक शिवीगाळ अन् सार्वजनिक धिंड; पुण्यात ११ पोलीसांवर गुन्हा दाखल

पुणे | Pune
पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ अल्पवयीन मुलांना बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवणे, मारहाण करणे, सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद वागणूक देणे आणि अनुसूचित जातीतील मुलांना जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपांप्रकरणी पोलिसांवर गंभीर कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाच्या चौकशी आणि निर्देशांनंतर ११ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात अल्पवयीन मुलांना मारहाण प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात 11 पोलिसांवर FIR नोंदवण्यात आला. आंबेगाव पठार पोलीस चौकीत 20 ते 21 जुलै 2026 रोजी घडलेल्या प्रकाराबद्दल मानवाधिकार आयोगाने संताप व्यक्त करत गुन्हा निर्देश करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी, पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाचे संकेत सतिश गोसावी यांनी तक्रार दिली होती. त्यानंतर, मानवी हक्क आयोगाच्या सुमोटो Case. No. 4848/13/23/2026 आणि 4774/13/23/2026 च्या आदेशान्वये कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

नेमकं काय प्रकरण आहे?
२० जुलै रोजी ४ अल्पवयीन मुलांना पोलिसांनी आंबेगाव पठार चौकीत आणले होते. तर, २१ जुलै रोजी पुन्हा ४ जणांना ताब्यात घेतले. त्यामुळे, एकूण ८ अल्पवयीन मुलांना पोलिसांनी बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवून बेल्टने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. येथे बालकल्याण पोलीस अधिकारी नसताना, API स्नेहल थोरात यांनी अहवाल लिहिला. त्यानुसार, गु.र.नं. 383/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पण, मुलांना बालकल्याण समितीसमोर हजर न करता पोलीस कोठडीत ठेवले. याप्रकरणातील अल्पवयीन मुले 1, 3, 7 आणि 8 हे अनुसूचित जातीचे असल्याने त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप देखील पोलिसांवर करण्यात आला आहे. जाणीवपूर्वक सार्वजनिक ठिकाणी अपमानित केल्याचा ठपका ठेवत अॅट्रॉसिटीचा दाखल झाला आहे.

डबल इंजिन सरकार फक्त वाफ आणि धूर सोडतंय, “मागच्या पॅकेजचं काय झालं?” उध्दव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

एका प्रकरणातील अल्पवयीन आरोपींना तीन दिवस डांबून ठेवल्याबद्दल आणि दुसऱ्या एका प्रकरणात अल्पवयीन आरोपींना कारच्या बोनेटला बांधून त्यांना मारहाण केल्याबद्दल पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील 11 पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज्य मानवाधिकार आयोगाने राज्याच्या पोलिस महासंचालकांना पुण्याचे पोलीस आयुक्तांसह तेरा पोलीसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र पोलिस आयुक्त आणि उपायुक्तांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान देत स्थगिती मिळवली. त्यामुळे पोलिस आयुक्त आणि उपायुक्तांना वगळुन भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील अकरा पोलीसांवर सी आय डी कडून गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आलाय. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांचा समावेश आहे. अल्पवयीन मुलांना डांबून ठेवणे, त्यांची धिंड काढणे, त्यांना मारहाण करुन ती वैद्यकीय तपासणीत आढळून येऊ नये यासाठी पुरावे दडवण्याचा प्रयत्न करणे आणि एट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

यांच्यावर गुन्हा दाखल
अल्पवयीन मुलांना मारहाण, कोणावर गुन्हा?

  1. मानसिंग पाटील – वरिष्ठ पोलीस निरीक्षक
  2. गणेश मोहिते – सपोनि
  3. स्नेहल थोरात – सपोनि
  4. निलेश मोकाशी – पोनि
  5. सुनिल हनवटे – पोहवा
  6. दिनेश टापके – पोहवा
  7. मितेश चोरमोले – पोलीस अंमलदार
  8. सागर बोरसे – पोलीस अंमलदार
  9. सोहम रोडेकर – पोलीस अंमलदार
  10. मंगेश पवार – पोलीस अंमलदार
  11. स्वप्ना भिसे – महिला पोलीस अंमलदार

कोणती कलमं लावली?
BNS 2023 – 115(2), 120, 127(2), 127(3), 131, 352, 351(2), 198, 199, 336(2), 337

बाल न्याय कायदा 2015 – कलम 74, 75 – बालकाची ओळख उघड करणे, क्रूर वागणूक

ॲट्रॉसिटी कायदा 1989 – 3(1)(e), (r), (u), (z), 3(2)(vii)

तपास अधिकारी – डीजीपी सुनील रामानंद

ताज्या बातम्या

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल

0
नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर २०२६ : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) संध्याकाळी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात...