Friday, January 23, 2026
Homeमहाराष्ट्रPune News : पुण्यात काँग्रेस-ठाकरे गटाची युती जाहीर, कुणाला किती जागा मिळणार?

Pune News : पुण्यात काँग्रेस-ठाकरे गटाची युती जाहीर, कुणाला किती जागा मिळणार?

पुणे । Pune

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. पुण्यात महाविकास आघाडी म्हणून सर्व पक्ष एकत्र लढतील अशी शक्यता वर्तवली जात असतानाच, आता मोठे फेरबदल झाले आहेत. शरद पवार गटाने अजित पवार गटाशी हातमिळवणी केल्याने, काँग्रेसने आता शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेला सोबत घेऊन नवीन युतीची घोषणा केली आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीच्या युतीला काँग्रेसचा विरोध पुण्यात सुरुवातीपासूनच शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होत्या. अजित पवारांना महाविकास आघाडीत सामील करून घेण्याबाबत बैठकाही झाल्या, मात्र काँग्रेसने याला तीव्र विरोध दर्शवला. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यानंतर काँग्रेसने आपली स्वतंत्र वाट निवडली असून ठाकरे गट आणि मनसेला सोबत घेण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस नेते सतेज पाटील आणि ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन या नव्या युतीची अधिकृत घोषणा केली.

YouTube video player

पुणे महापालिकेच्या एकूण १६५ जागांसाठी या नव्या युतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस ८० जागांवर तर शिवसेना ठाकरे गट ६५ जागांवर निवडणूक लढवणार आहे. उर्वरित २० जागा मित्र पक्षांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत १०५ जागांचा निर्णय झाला असून त्यात काँग्रेसला ६० आणि ठाकरे गटाला ४५ जागा देण्यात आल्या आहेत. उर्वरित ५० जागांबाबत उद्यापर्यंत अंतिम निर्णय घेतला जाईल. जर इतर कोणतेही लहान पक्ष युतीत सामील झाले नाहीत, तर राखीव ठेवलेल्या २० जागा काँग्रेस आणि ठाकरे गट आपापसात वाटून घेतील. विशेष म्हणजे, मनसेला ठाकरे गटाच्या कोट्यातून जागा दिल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सचिन अहिर यांची टीका पत्रकार परिषदेत बोलताना सचिन अहिर यांनी भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांवर सडकून टीका केली. “पुणे आणि पिंपरीमध्ये विरोधक शिल्लक ठेवायचे नाहीत, हे भाजपचे प्लॅनिंग आहे. काहींना झालेले राजकीय आजार हा त्यांच्या रणनीतीचा भाग आहे,” असा टोला त्यांनी लगावला. अहिर पुढे म्हणाले की, “पुणे पालिकेत बहुमत मिळाले नाही तर आम्ही भाजपसोबत जाणार नाही, असे अजित पवारांनी स्पष्टपणे जाहीर करावे. १५ दिवसांचा तात्पुरता घटस्फोट घ्यायचा, आम्ही एकमेकांशी बोलत नाही असे भासवायचे आणि पुन्हा सत्तेसाठी एकत्र यायचे, असा हा प्रकार आहे.” पुण्यात सत्तेत परिवर्तन घडवण्यासाठी केवळ काँग्रेस आणि ठाकरे गटच सक्षम पर्याय असल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्ह्यात एक लाखांहून अधिक लाडक्या बहिणींची अडचण?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेने नगर जिल्ह्यातही महिलांची डोकेदुखी वाढवली. त्यातच जानेवारी महिन्यात अनेक पात्र...