संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातून जाणार्या पुणे-नाशिक महामार्गावरील (Pune Nashik Highway) माहुली घाटात कारवरील (Car Accident) नियंत्रण सुटल्याने थेट शंभर ते दीडशे फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू (Driver Death) झाल्याची घटना बुधवारी (दि.17) सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, अक्षयकुमार सहादू वाढवणे (वय 32, रा. सुपा, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) हे कारमधून (क्र.एमएच.12, पीझेड. 7398) पुणे-नाशिक महामार्गावरुन पुणेच्या दिशेने प्रवास करत होते. दरम्यान, माहुली घाटात (Mahuli Ghat) आले असता त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने थेट शंभर ते दीडशे फूट खोल पडून मोठा अपघात झाला. या अपघातात कारचालक अक्षयकुमार वाढवणे हे जागीच ठार (Death) झाले.
या घटनेची माहिती डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक आर. बी. बांबळे यांना मिळताच त्यांनी पथकासह अपघातस्थळी धाव घेतली. घारगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी, टोलनाका कर्मचारी यांच्या मदतीने मृतदेह दरीतून बाहेर काढून खाजगी रुग्णवाहिकेने घुलेवाडी (Ghulewadi) येथील ग्रामीण रुग्णालयात हलवला. येथील वैद्यकीय अधिकार्यांनी दिलेल्या अहवालावरुन घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.




