Tuesday, January 6, 2026
HomeनगरAccident News : उभ्या दुचाकीला कारने दिली धडक; एक ठार

Accident News : उभ्या दुचाकीला कारने दिली धडक; एक ठार

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर (Pune Nashik Highway) अपघातांची मालिका सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवारी (दि.11) सकाळी दहा वाजेच्या सुमारास आनंदवाडी शिवारातील सावजीबाबा मंदिराच्या पाठीमागे चारचाकी वाहनाने दुचाकीला (Car and Bike Accident) दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार (Death) झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

याबाबत डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राकडून मिळालेली माहिती अशी, की सचिन बबन इघे (वय 31, रा. खडकवाडी, ता. पारनेर) हा त्याच्याकडील दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करुन लघुशंकेसाठी थांबला होता. त्याचवेळी दत्तात्रेय देवराम गाडगे (वय 49, रा. लोणी, ता. राहाता) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन हयगयीने चारचाकी वाहन चालवून उभ्या दुचाकीला जोराची धडक (Hit) दिली. यामध्ये दुचाकीस्वार सचिन इघे हा गंभीर जखमी (Injured) होवून ठार झाला.

YouTube video player

दरम्यान, या अपघाताची माहिती डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राला मिळताच सहायक पोलीस निरीक्षक रावसाहेब बांबळे यांच्यासह पथकाने तत्काळ अपघातस्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने गंभीर जखमी इघे यास रुग्णवाहिकेतून संगमनेरमधील (Sangamner) खाजगी रुग्णालयात हलविले. परंतु, डॉक्टरांनी तपासून मयत असल्याचे सांगितले. यामुळे काहीकाळ वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन के्रनच्या साहाय्याने रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

ताज्या बातम्या

नवीन नाशकात प्रचाराचे पैसे न दिल्याने महिलांमध्ये हाणामारी

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik प्रचारासाठी बोलाविलेल्या तब्बल ६५ महिलांना दिवसभर ताठकळत ठेवत अन्न पाण्याशिवाय पैसे न दिल्याने दोघा महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडल्याने...