संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
भरधाव वेगाने नाशिकहून पुण्याला (Nashik Pune) जाणार्या कंटेनरचालकाला झोपेची डुलकी लागल्याने तो कंटेनर (Container) थेट हॉटेलमध्ये (Hotel) जाऊन घुसला. त्यामुळे गाढ झोपलेले हॉटेल मालक दत्तात्रेय रंगनाथ मांडेकर हे बालंबाल बचावले आहे. परंतु, या अपघातात (Accident) हॉटेलचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर घटना सोमवारी (दि.15) पहाटे पाच ते सव्वा पाच वाजेच्या सुमारास पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील (Pune Nashik Highway) रायतेवाडी फाटा शिवारात घडली आहे.
रायतेवाडी फाटा येथे महामार्गाच्या पूर्वेला दत्तात्रेय मांडेकर यांनी 2 ते 3 महिन्यांपूर्वी हॉटेल दिव्यांका सुरू केले आहे. रविवारी मध्यरात्री मांडेकर यांनी आपले हॉटेल बंद केले आणि हॉटेलमध्येच झोपले असता पहाटे पाच ते सव्वा पाच वाजेच्या सुमारास अचानक भरधाव वेगाने नाशिकहून पुणेकडे जात असणारा कंटेनरवरील (क्र. एचआर.55, एटी.2926) चालकास झोपेची डुलकी लागली आणि तो कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसला.
मोठा आवाज झाल्याने मांडेकर झोपेतून जागे झाले आणि समोरील दृश्य पाहून चांगलेच घाबरून गेले. त्यांनी आरडाओरडा केला असता परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी हॉटेलची पाहणी केली असता साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान (Loss) झाले आहे. या अपघाताची माहिती समजताच संगमनेर शहर पोलीस (Sangamner Police) घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या साह्याने कंटेनर बाहेर काढत चालकास ताब्यात घेतले आहे.




