Tuesday, March 25, 2025
Homeनगरपुणे-नाशिक महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात

पुणे-नाशिक महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात

एक कार पलटी || पाच ते सहाजण जखमी

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील (Pune-Nashik Highway) एकोणावीस मैल येथे चार वाहनांचा विचित्र अपघात (Accident) झाल्याची घटना रविवारी (दि.9) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात अंदाजे पाच ते सहाजण किरकोळ जखमी (Injured) झाले आहे तर एक कार पलटी झाली आहे. याबाबतची माहिती अशी, की सध्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे एका लेनवरूनच वाहतूक वळविण्यात आली आहे. रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नाशिककडून पुणेच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक खंदरमाळ शिवारातील एकोणावीस मैल येथे आला असता याचवेळी ट्रकने पुढे चालणार्‍या कारला धडक दिली. यामुळे तीन कार एकमेकांवर जोरदार आदळल्या तर एक कार थेट पलटी झाली. कारमधील अंदाजे पाच ते सहाजण किरकोळ जखमी झाले आहे. दरम्यान अपघात (Accident) झाल्याची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जखमींना जवळच असलेल्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते.

- Advertisement -

या विचित्र अपघातात तिन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती समजताच हिवरगाव पावसा टोलनाका, डोळासणे महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यानंतर अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. जेव्हापासून काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाले आहे, तेव्हापासून अपघातांची मालिका सुरू झाली आहे. दररोज अपघात होत आहे. आत्तापर्यंत अनेकांना आपले जीव गमवावे लागले असून काहीजण गंभीर जखमी (Injured) देखील झाले आहे. मात्र याकडे कोणाचेच लक्ष नाही. दररोजच्या अपघाताने (Accident) वाहनचालकांसह प्रवाशी आणि स्थानिक नागरिकही अक्षरशः वैतागले आहे.

ठेकेदार कंपनीचा हलगर्जीपणा…
ज्या ठेकेदाराने सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम घेतले आहे. त्यांनी म्हणाव्या तशा उपाययोजना राबवल्या नाहीत. यामुळे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने अपघात होत असून यामध्ये काहीजणांचे मृत्यू देखील झाले असून अनेकजण जखमीही झाले आहे. याचबरोबर वाहनचालकांसह प्रवाशांना देखील मोठा त्रास सहण करावा लागत आहे. यामुळे जोपर्यंत सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत अपघात चालू राहणार आहे. यामुळे संबंधित ठेकेदाराने अपघात होवू नये म्हणून उपाययोजना करणे गरजेचे आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...