Saturday, July 27, 2024
Homeनगरबसला टेम्पो धडकला; टायर पंक्चर काढणारा बसचालक ठार

बसला टेम्पो धडकला; टायर पंक्चर काढणारा बसचालक ठार

घारगाव | Ghargav

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (Maharashtra State Road Transport Corporation) बसचे टायर पहाटेच्या सुमारास पंक्चर (Bus tire Puncture) झाल्याने बसचालक पंक्चर काढण्यासाठी जॅक लावत होता. त्यावेळी पुणे-नाशिक महामार्गावर (Pune Nashik Highway) पाठीमागून भरधाव येणाऱ्या टेम्पोची बसला जोराची धडक बसली. यात बसचालक जागीच ठार (Bus Driver Death) झाला. हा अपघात (Accident) शनिवारी (दि.१२) पहाटे ३. ५५ वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर (Sangamner) तालुक्यातील १९ मैल नांदूरखंदरमाळ (Nandur Khandarmal) येथे घडला.

- Advertisement -

श्रीरामपूरच्या मुख्याध्यापकासह कोर्‍हाळ्याच्या दोघांवर गुन्हा; हे आहे कारण

मयूर आनंदा मुंढे (वय ४५, रा. दत्तचौक, सिडको, नाशिक) असे अपघातातील (Accident) मयत बस चालकाचे (Bus Driver) नाव आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिस ठाण्याच्या (Ghargav Police Station) हद्दीत हा अपघात घडला. या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील आळेफाटा पोलिस ठाण्यात (Alephata Police Station) बसवाहक संदीप नामदेव खोडे (रा. सातपूर, जि. नाशिक) यांनी खबर दिली आहे.  

‘त्या’ वैद्यकीय अधिकार्‍यांसह तिघांवर गुन्हा दाखल होणार!

नाशिकहून पुण्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या आयशर टेम्पोची (एच. आर. ४७, ई. ४०७८) ची टायर पंक्चर झालेल्या नंदूरबार-पुणे बसला (एम. एच. २०, बी. एल. ४०९४) जोराची धडक बसली. या अपघातात (Accident) पंक्चर काढत असलेले चालक मुंढे गंभीर जखमी (Injured) झाले. वाहक खोडे यांनी नवापूर-पुणे बसचे चालक अरुण शेलार यांच्याशी संपर्क करत त्यांना अपघात घडल्याचे सांगत पाठीमागे बोलावून घेतले. शेलार हे बस घेऊन आल्यानंतर मुंढे यांना महामंडळाच्या बसमधून आळेफाटा येथील माउली हॉस्पिटल येथे नेण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू (Death) झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल. 

झेडपीच्या आरोग्य विभागातील 1100 जागा रिक्त

- Advertisment -

ताज्या बातम्या