Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजPune News : पुण्यात पुन्हा हिट अँड रनची घटना, मद्यपी डंपरचालकाने ९...

Pune News : पुण्यात पुन्हा हिट अँड रनची घटना, मद्यपी डंपरचालकाने ९ जणांना चिरडलं; तिघांचा मृत्यू

पुणे | Pune

- Advertisement -

राज्यात काही दिवसांपासून सुरू असणारे अपघाताचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नसून आणखी एका भीषण अपघाताने पुणे पुन्हा एकदा हादरले आहे. पुण्यात काम शोधण्यासाठी आलेल्या कामगारांनी फुटपाथवर आसरा घेतला होता. पण भरधाव वेगाने आलेल्या मद्यपी डंपर चालकाने ९ जणांना चिरडले. यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा ही समावेश आहे.

नेमके काय घडले?

पुण्यातील वाघोली परिसरात केसनंद फाट्यावर एका भरधाव येणाऱ्या डंपरने फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांमध्ये दोन बालकांसह त्यांच्या काकाचा समावेश आहे. या घटनेत सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

याप्रकरणी डंपर चालक गजानन शंकर तोट्रे, २६ वर्षे रा. नांदेड याला अटक केली असून त्याच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गजानन हा मुळचा नांदेडचा आहे, अपघातातील मृत कामगार हे मुळचे अमरावतीतील आहे. ही घटना रात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बिल्टवेल इंटरप्राईजेस कंपनीचा हा डंपर आहे. हा डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातावेळी फुटपाथवर १२ जण झोपले होते. तर काहीजण फूटपाथच्या बाजूला असलेल्या झोपडीत झोपले होते.

दरम्यान, या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी माहिती सांगितली की, ‘आम्ही ४० जण कामासाठी इथे पुण्याते आलो आहोत, इकडे काम भेटते म्हणून आम्ही अमरावती वरून पुण्याला काल रात्री आलो. आम्ही चार वर्षाआधी पण इथे काम करत होतो. आम्ही इथेच राहतो. गेल्या चार वर्षापासून आम्ही इथून कुठे गेलो नाही, आम्ही इथे झोपल्यानंतर डंपर चालक सरळ अंगावर आला, आणि बाळांच्या अंगावर घातला’.

मृतांमध्ये, विशाल विनोद पवार वय २२ वर्ष, वैभवी रितेश पवार वय १ वर्ष आणि वैभव रितेश पवार वय २ वर्ष या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात ६ जण जखमी झाले आहेत. जानकी दिनेश पवार (२१), रिनिशा विनोद पवार (१८), रोशन शशादू भोसले (९), नगेश निवृत्ती पवार (२७), दर्शन संजय वैराळ (१८) आलिशा विनोद पवार (४७) अशी या ६ जणांची नावे आहेत. या दुर्घटनेतील जखमीवर आयनॉक्स हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यांना ससून रुग्णालयात रवाना केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...