Sunday, July 7, 2024
Homeमहाराष्ट्रPune Porsche Car Accident : विशाल अग्रवालला २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Pune Porsche Car Accident : विशाल अग्रवालला २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

कोर्टाच्या परिसरात अंगावर शाईफेकीचा झाला प्रयत्न

मुंबई | Mumbai

- Advertisement -

पुणे शहरातील (Pune City) कल्याणीनगर भागात (Kalyaninagar Area) वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत आपल्या पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेत बाईकवर असणाऱ्या अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू (Death) झाला होता. यानंतर पोलिसांनी या घटनेतील आरोपी असणाऱ्या वेदांतला अटक केली होती. मात्र, त्याला तातडीने जामीनही (Bail) मिळाला होता.पंरतु,पोलिसांनी
वेदांतची कसून चौकशी केली असता त्याने वडिलांच्या सांगण्यावरून आपण कार चालवल्याचे म्हटले होते.

हे देखील वाचा : “कुणालाही पाठीशी घालू नका, राजकीय दबावाला बळी पडू नका”; मुख्यमंत्री शिंदेंचे ‘त्या’ प्रकरणासंबंधी पोलिसांना निर्देश

त्यानंतर पोलिसांनी वेदांतचे वडील विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगरमधून मंगळवार (दि.२१) रोजी पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले होते. यानंतर आज त्यांना पुणे न्यायालयात (Pune Court) दाखल करण्यात आले. मात्र त्याआधीच पुण्यात भावनांचा उद्रेक पाहायला मिळाला. पुणे पोलिसांकडून (Pune Police) अग्रवाल यांना न्यायालयात हजर करण्यात येत असताना पुण्यातील वंदे मातरम् संघटनेच्या ५ते ८ कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर शाईफेकीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे विशाल अग्रवाल बचावला. याप्रकरणी पोलिसांनी वंदे मातरम संघटनेच्या पाच ते आठ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

यावेळी माध्यमांशी संवाद साधतांना वंदे मातरम संघटनेचे अध्यक्ष सचिन जामगे म्हणाले की, त्या अल्पवयीन मुलावर कठोर कारवाई व्हावी यासाठी आज आम्ही शाईफेक आंदोलन केले आहे. त्या मुलाचे वडील विशाल अग्रवाल याने जर आपल्या मुलाला गाडी दिली नसती, तर दोन निष्पाप बळी गेले नसते. पण त्याने गाडी दिल्याने त्याच्या मुलाने दोन निष्पाप मुलांचा जीव घेतला आहे. अशा या पिता-पुत्रावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

हे देखील वाचा : Nashik Crime News : पेठरोडला चार ते पाच वाहनांची तोडफोड

दरम्यान, या अपघातप्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या विशाल अग्रवालच्या (Vishal Agrwal) मुलाला बुधवार (दि.२२) रोजी सकाळी बालहक्क न्यायालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्याच्या वकिलांनी न्यायालयासमोर बाजू मांडली. “माझा अशील अल्पवयीन आहे, याचा विचार करुन त्याच्याबाबत शिक्षेचा निर्णय घ्यावा, असे आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर सरकारी वकिलांनी आपली बाजू मांडताना अल्पवयीन मुलावरील आरोपांचे गांभीर्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर आता दुपारी साडेचार वाजता बालहक्क न्यायालय निकाल देणार असून या निकालात नेमकं काय असेल, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

हे देखील वाचा : IPL 2024 : आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एलिमिनेटर सामना

विशाल अग्रवाल यांच्यासह तिघांना पोलीस कोठडी

विशाल अग्रवाल यांच्यासह बार मालक आणि व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश गावकरे यांना आज पुणे येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे सत्र न्यायालयामध्ये आज या प्रकरणावर सुनावणी झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या