Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात राज्यपालांना काळे झेंडे दाखवले

पुण्यात राज्यपालांना काळे झेंडे दाखवले

पुणे | Pune

स्वराज्य संस्थेच्या वतीने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पुण्यात (Pune) काळे झेंडे दाखवण्यात आले. ‘राज्यपाल हटवा, अस्मिता वाचवा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणा देत राज्यपालांचा निषेध करण्यात आला.

- Advertisement -

एका कार्यक्रमासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आज पुण्यामध्ये आलेले आहेत. पाषाण येथे असलेल्या अभिमान श्री सोसायटी जवळ राज्यपालांचा निषेध नोंदवण्यात आला. संभाजीराजे छत्रपती यांच्या संघटनेकडून काळे झेंडे दाखवण्यात आले.

राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर विविध संघटना आक्रमक झाल्याचे चित्र राज्यभरात दिसून येत आहे. खासदार उदयनराजे आणि संभाजी राजे यांनी राज्यपालांच्या विधानावरून त्यांच्यावर टीका करत, त्यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी केंद्र सरकारकडे केलेली आहे.

राज्यपालांनी महत्त्वाच्या पदावर असताना अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात खासदार उदयनराजे आक्रमक होत त्यांनी तीन डिसेंबर रोजी किल्ले रायगड येथे आक्रोश आंदोलन आयोजित केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या