पुणे (प्रतिनिधि)
लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुण्यातील विशेष न्यायालयाने शुक्रवारी २५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. या सुनावणीसाठी राहुल गांधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर होते.
राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यावर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. दाव्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी राहुल गांधी यांच्या वतीने वकील अॅड. मिलिंद पवार यांनी अर्ज केला होता. विशेष न्यायालयाने अर्ज मंजूर केला. पुढील सुनावणी १८ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते असून त्यांना हाय सिक्युरिटी आहे. अशा परिस्थितीत न्यायालय समोर स्वतः व्यक्तीच्या उपस्थित राहणे सर्वांनाच त्रासदायक होईल. सर्वोच्य न्यायालय, ऊच्च न्यायालयाच्या निर्देशा नुसार आरोपी व्हीडिओ कॉन्फरसिंगद्वारे न्यायालया समोर उपस्थितीत राहू शकतात आणि म्हणून राहुल गांधी यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग या सुविधे वरून न्यायालयासमोर उपस्थित राहण्याची परवानगी मिळावी असा अर्ज राहूल गांधी यांचे वकील अॅड मिलिंद पवार यांनी न्यायालयात केला. तो अर्ज न्यायालयाने मंजूर केला.
त्यानंतर राहूल गांधी यांना पुणे जिल्हा न्यायालयातून दिल्ली येथील त्यांच्या कार्यालयात मेल वरून लिंक पाठवण्यात आली. राहुल गांधी त्यांच्या दिल्ली येथील कार्यालयातून न्यायालया समोर जवळपास २० मिनीटे शांत बसून होते. न्यायाधीश शिंदे यांनी त्यांना नाव विचारले. राहूल गांधी यांनी न्यायालयाचे आभार मानले.
त्यानंतर अॅड. मिलिंद पवार यांनी राहुल गांधी यांना खटल्यात जामीन मिळावा या साठी अर्ज केला. जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर करून रुपये पंचवीस हजाराच्या जात मुचलक्यावर राहुल गांधी यांची बदनामीच्या खटल्यात जामीन मंजूर केला. राहुल गांधी यांच्या वतीने माजी आमदार मोहन जोशी यांनी राहुल गांधी यांना जामीन दिला.
त्यानंतर अॅड. मिलिंद पवार यांनी राहुल गांधी यांना सदर खटल्यामध्ये प्रत्येक तारखेस त्यांच्या वतीने त्यांचे वकील अॅड मिलिंद पवार हेच उपस्थित राहतील. निकालाच्या वेळीच राहुल गांधी न्यायालयासमोर उपस्थित राहतील. तशी परवानगी मिळावी असा अर्ज अॅड मिलिंद पावर यांनी केला तो अर्ज देखील न्यायालयाने मंजूर केला. मागील तारखेस फिर्यादी यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात राहुल गांधी यांनी कोर्टाचा अवमान केला, राहूल गांधी यांना न्यायालयाचे समन्स मिळूनही ते न्यायालयात व्यक्तीच्या उपस्थित झाले नाहीत म्हणून त्यांना पकड वॉरंट काढावे व जामीनपात्र वॉरंटही काढावे असे तीन प्रकारचे अर्ज केले होते.
तीनही अर्जावर आज अॅड. मिलिंद पवार यांनी तीव्र आक्षेप घेतल्याने न्यायालयाने फिर्यादी यांचे तिनही अर्ज फेटाळून लावले. दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी या खटल्याची पुढील सुनावनी होणार आहे. या खटल्यामध्ये अॅड. मिलिंद पवार यांना अॅड.योगश पवार अॅड.हर्षवर्धन पवार, अॅड.अजिंक्य भालगरे, अॅड.सुयोग गायकवाड, अॅड. प्राजक्ता पवार भोसले व अॅड. ज्ञानेश्वरी जाधव यांनी मदत केली.