पुणे | Pune
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी असलेल्या फरार सासऱ्याला राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अखेर सातव्या दिवशी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना आज (गुरुवार) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास एक सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. दोघांचा ही सात दिवसांपासून शोध सुरु होता. अखेर त्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी सापळा रचत पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास स्वारगेट येथून अटक केली.
१६ मे रोजी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या दिवसापासून राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे हे फरार होते. पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना आधीच पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांना २६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
वैष्णवीचा तिच्या सासरी संशयास्पद मृत्यू झाला होता. प्राथमिक माहितीनुसार, तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता, असा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवून दिली असून, आता या संपूर्ण प्रकरणात न्यायासाठी मोठा आवाज उठवला जात आहे.
अटकेच्या आधीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
वैष्णवी हगवणे हिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे याला अटक करण्यात आले आहे. अटकेआधीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून यामध्ये आरोपी हॉटेलमध्ये जेवणावर ताव मारताना दिसत आहेत. आरोपी राजेंद्र आणि त्याचे काही मित्र हॉटेलमध्ये जेवताना दिसताये. तसेच पुढे काय करायचे याचे प्लॅनिंग देखील केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
राजकीय आणि सामाजिक दबाव वाढला
गुरवारी दिवसभर राजकीय नेत्यांनी कस्पटे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात येईल अस आश्वासन दिले गेले. पोलिसांची सहा पथक आरोपींचा शोध घेत होते. अखेर त्यांना स्वारगेटमधून अटक करण्यात आले. अजित पवार यांनी देखील फोन द्वारे कस्पटे कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले.
पहाटे काय घडले?
राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे दोघे पुण्यातील एका खेडेगावात लपून बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे आज पहाटे दोन वाजता पोलिसांनी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. सध्या त्यांना बावधन पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा