Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक, घरात सापडले कोट्यावधींचं घबाड

मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक, घरात सापडले कोट्यावधींचं घबाड

पुणे । Pune

पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे माजी सभापती (Pune Zilla Parishad Ex Chairman) मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांना सक्तवसुली संचलनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीने (ED) अटक केली आहे.

- Advertisement -

मंगळवारी ईडीच्या तथकाने त्यांच्या घराची झाडाझडती घेतली असता घरात ५ कोटी ६० लाखांची रोकड तसेच १ कोटींची ४ घड्याळे आढळून आली. मंगळवारी रात्री उशिरा ईडीने बांदल यांच्यावर अटकेची कारवाई केली. यामुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

हे हि वाचा : “ए मिटकरी, तुझी पात्रता…”; भाजप नेत्याची अमोल मिटकरींवर शेलक्या शब्दात टीका

मिळालेल्या माहितीनुसार, मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानी मंगळवारी ईडीने अचानक धाड टाकली. मंगलदास बांगल यांच्या शिक्रापूर आणि पुण्यातील हडपसर भागातील महंमदवाडी परिसरात असलेल्या निवासस्थानी ईडीने सकाळी ७ वाजताच कारवाईला सुरुवात केली. या कारवाईत त्यांच्या घरात ५ कोटी ६० लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्याकडे पाच अलिशान कार, एक कोटींची चार घड्याळेही जप्त करण्यात आली आहेत.

ईडीने तब्बल १६ तास कारवाई केली होती. यावेळी मंगलदास बांदल यांची कसून चौकशीही करण्यात आली. तसेच शिक्रापूर येथील घरी बांदल यांच्या पत्नी रेखाताई बांदल, दोन भाऊ आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात आली. तर, महंमदवाडी येथील बंगल्यात राहत असलेल्या मंगलदास बांदल यांचीदेखील ईडी अधिकाऱ्यांनी चौकशी केली. ईडीच्या या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. आज त्यांना मुंबईच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

हे हि वाचा : काँग्रेस आमदार थेट अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत; लवकरच पक्षप्रवेश?

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, इंदापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप मेळाव्याला बांदल यांनी हजेरी लावल्याने त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...