Saturday, July 27, 2024
Homeनगरपुणतांब्यात सराफ दुकान फोडण्याचा प्रयत्न

पुणतांब्यात सराफ दुकान फोडण्याचा प्रयत्न

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा (Puntamba) येथे चारचाकीमध्ये येऊन मुख्य बाजारपेठेतील सराफाचे दुकान फोडण्याचा प्रयत्न (Saraf Shop Theft Try) केला परंतु तो असफल झाला.

- Advertisement -

शांताबाई ज्वेलर्स नावाने गणेश संजय कुलथे यांचे दागदागिन्यांचे (Jewelry) दुकान सोमवारी रात्री सव्वादोनच्या सुमारास पांढर्‍या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमध्ये चेहरा झाकलेले साधारण 4 जणांनी दुकानाची कुलूप कटरच्या साह्याने तोडून दुकानांमध्ये प्रवेश केला. दुकानाच्या काउंटरमध्ये सोन्या चांदीचे दागिने (Jewelry) नसल्यामुळे चोरांनी आपला मोर्चा तिजोरीकडे वळवला.

मुलीला नग्न फोटो पाठविले, बेलापुरातील तरुणावर गुन्हा

तिजोरीवर (Locker) हातोड्याच्या साह्याने दोन-तीन आघात करण्यात आले परंतु चोरांना तिजोरी उघडता आली नाही. चोरांच्या हाती काहीही मुद्देमाल सापडला नाही. त्याच दरम्यान रात्रीच्या वेळी दोन जण रस्त्याने जात असताना त्यांना दिसले त्यांनी दुकानदार गणेश कुलथे यांना फोनद्वारे सांगितले. या गडबडीत चोरांनी (Thief) त्या ठिकाणावरून धूम ठोकली.

सकाळी सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता विना नंबरची पांढर्‍या रंगाची स्विफ्ट कार दिसते. त्या कारचे तोंड बाजारपेठेच्या दिशेने होते. दुकानातील सर्व दागिने (Jewelry) तिजोरीमध्ये सुरक्षित असल्याचे दुकानदार गणेश कुलथे यांनी सांगितले. पोलीस स्टेशन (Police Station) येथील होमगार्ड येऊन चौकशी करून गेले. दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने हिवाळ्यातही चोरांनी चोरीचे धाडसी सत्र सुरू केले याबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

दिवाळीला मिळणार रवा, चणाडाळ, साखर, तेल, मैदा व पोहे

या अगोदरच्या चोर्‍यांचा सुद्धा तपास लागलेला नाही. विशेष म्हणजे गावात सर्वच अवैध धंदे जोमात सुरु आहे. तीन महिन्यापूर्वी गावात वाळू तस्करामध्ये झालेल्या मारामार्‍यामधील आरोपी (Accused) अजूनही राहाता पोलिसांना (Rahata Police) सापडत नाही. गावात पोलिसांचा धाकच राहिलेला नाही. पोलिसांनी चोरांचा वेळेतच बंदोबस्त करून त्यांना पायबंद घातला पाहिजे. तसेच अवैध धंद्याचा बंदोबस्त तातडीने करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आरोपीला भेटण्यासाठी बनावट आधार कार्डचा वापर

- Advertisment -

ताज्या बातम्या