सद्गुरू – मुख्यत: शरीर हे पाच तत्वांचा खेळ आहे – जल, पृथ्वी, वायू, अग्नि आणि आकाश. भारतात सर्वसामान्यपणे म्हटलं जातं की शरीर हे या पाच तत्वांनी बनलेली कळसुत्री बाहुली आहे. तुमच्या आत हे पाच घटक कसे वागतात यावरून आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ठरवली जाते.
भूत शुद्धी (भूत म्हणजे तत्वं, शुद्धि म्हणजे शुद्ध करणे) ही योग विज्ञानातील एक मूलभूत साधना आहे, म्हणजेच या तत्वांच्या कलंकांपासून मुक्त होऊन, भौतिक पैलूच्या पल्याड असलेल्या आयामाप्रती ग्रहणशील बनणे. भूत शुद्धी करण्यासाठी तुम्ही काही अगदी नैसर्गिकरित्या करू शकता, अर्थात अगदी सर्वोच्च प्रकारची भूतशुद्धी नसली तरीही, पाच तत्वं थोडीफार नितळ होतील.
जल- पाच घटकांपैकी आपली सर्वात मोठी चिंता आहे पाणी. पाण्याची स्मरणशक्ती प्रचंड असते आणि शरीराचा ते बहात्तर टक्के भाग आहे. त्यात तुम्ही कडुलिंबाची किंवा तुळशीची पाने घालू शकता, ज्यामुळे पाणी खूप चैतन्यशील व उर्जायुक्त होईल. दुसरी गोष्ट म्हणजे तांब्याच्या भांड्यात पाणी साठवणे उत्तम जेणेकरुन तांब्यातील गुण पाणी आत्मसात करेल जे तुमच्यासाठी फायदेशीर आहे.
पृथ्वी- पृथ्वी बारा टक्के आहे. म्हणजे अन्न तुमच्यात कसं जातं आणि तुम्ही ते कसं आपलसं करता हे फार महत्त्वाचे आहे. तुम्ही खाणारे अन्न हे जीवन आहे; इतर जीव आपल्याला जगवण्यासाठी ते आपले जीवन समर्पित करत आहेत. आमचे जीवन टिकवण्यासाठी आपला जीव समर्पित सर्व प्राणिमात्रांप्रती प्रचंड आपण कृतज्ञता व्यक्त करून ग्रहण करू, तर तेच अन्न आपल्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारे कार्य करेल.
वायू- वायू सहा टक्के आहे. त्यापैकी तुमचा श्वास केवळ एक टक्का किंवा त्याहूनही कमी आहे. हवेचं इतर कार्य अनेक वेगवेगळ्या प्रकारे घडत आहे. तुम्ही केवळ श्वासोच्छवास करत असलेला वायूच तुमच्यावर प्रभाव टाकतो असे नाही तर तुम्ही तुमच्यातील वायू कशा पद्धतीने जपता याचाही परिणाम होतो. तुम्ही श्वास घेत असलेल्या त्या एक टक्क्याची देखील काळजी घेणे आवश्यक आहे, परंतु तुम्ही एखाद्या शहरात राहत असल्यास; कोणत्या प्रकारची हवा घेत आहात हे तुमच्या हातात असू शकत नाही. म्हणून उद्यानात किंवा जलाशयाकाठी फिरायला जा. विशेषत: जर तुमची मुले असतील तर महिन्यातून एकदा तरी त्यांना बाहेर घेऊन जाणे महत्त्वाचे आहे. सिनेमाला घेऊन जाण्याऐवजी त्यांना नदीवर घेऊन जा, त्यांना पोहायला शिकवा, डोंगरावर किंवा अगदी मोठ्या खडकावरही चढायला शिकवा.
आग- दररोज तुमच्या शरीरावर थोडा सूर्यप्रकाश पडू द्या कारण सूर्यप्रकाश अजूनही शुद्ध आहे – सुदैवाने कोणीही त्याला दूषित करू शकत नाही! तुमच्यात कशा प्रकारचा अग्नि जळतो याची तुम्ही काळजी घेऊ शकता – हा लोभाचा अग्नी आहे, द्वेषाचा अग्नी आहे, क्रोधाचा अग्नी आहे, प्रेमाचा अग्नी की करुणेचा? जर तुम्ही याची काळजी घेतली तर तुम्हाला तुमच्या शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीची चिंता करण्याची गरज नाही. त्याची आपोआपच काळजी घेतली जाते.
आकाश- आकाश ही सृष्टी आणि जो सृष्टीचा स्रोत आहे या दोघांना जोडणारा घटक आहे. जर आपण इतर चार घटकांना उत्तम स्थितीत ठेवले तर आकाश स्वत: च आपली काळजी वाहील. आयुष्यात तुम्हाला जर आकाशाचे सहकार्य कसे मिळवावे हे माहीत असल्यास तुमचे हे जीवन धन्य असेल.