Tuesday, November 5, 2024
Homeभविष्यवेधत्रैमासिक भविष्य - मेष : आर्थिक स्थिती उत्तम राहील

त्रैमासिक भविष्य – मेष : आर्थिक स्थिती उत्तम राहील

जुलै – 2023

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी गुरू-राहू-हर्षल, तृतीयात रवि- बुध, चतुर्थात शुक्र, पंचमात मगळ, सप्तमात केतू, दशमात प्लुटो , लाभात शनि, व्ययात नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

- Advertisement -

तुमची रास – राशीची आद्याक्षरे चू, चे, चो, ला, ले, लो आ अशी आहेत. राशीचे चिन्ह मेंढा आहे. राशी स्वामी- मंगळ, तत्व-अग्नी, चर राशी असल्याने स्वभाव चंचल. पूर्व दिशा फायद्याची आहे. लिंग-पुरूष, वर्ण-क्षत्रिय, स्वभाव-क्रूर, पित्त प्रकृती, राशीचा अंमल डोक्यावर असल्याने डोक्याल इजा होऊ देऊ नका. शुभ रंग-लाल, शुभ रत्न-पोवळे, शुभ दिवस-मंगळवार, रविवार, देवता-शिव,भैरवनाथ, मारूती. शुभ अंक-9, शुभ तारखा-9/18/20. मित्र राशी-सिंह,तुला,धनु. शत्रुराशी- मिथुन, कन्या, स्वभाव- अत्यंत क्रोधी, कुटुंबाचे उत्तमप्रकारे पालनपोषण कराल. आव्हान स्वीकारण्याची खुमखुमी.

व्यवस्थानी नेपच्यून आहे. संशोधनासारख्या कामात चांगले यश मिळेल. गुप्तहेर खात्यातील कर्मचार्‍यांना आरोपी टीपण्यात यश मिळेल. हॉस्पिटल, तुरूंगाशी संबंधित कामापासून लाभ होतील.

स्त्रियांसाठी – चतुर्थात शुक्र आहे. आनंदी वृत्ती प्रदान करील. कुटूंबात हुकूमाची राणी व्हाल. हातात पैसा खेळत राहील. मनासारखी शॉपिग कराल. पतीराजांची मर्जी बहाल होईल.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात आर्थिक प्रगती होईल. आळस टाळावा. गेलेले दिवस परत येत नाहीत.

शुभ तारखा – 3, 7, 8, 10, 11, 19, 23, 24, 26,28

ऑगस्ट – 2023

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी गुरु-राहू-हर्षल, चतुर्थात रवि, पंचमात -बुध-मंगळ-शुक्र, सप्तमात -केतू, दशमात प्लूटो, लाभात शनि, व्ययात नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

लग्नी शुक्र आहे. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यक्तीमत्व प्रभावशाली राहील. संसारात चातुर्याने वागाल. धार्मिक ग्रंथ वाचण्याची आवड वाटेल. शरीर प्रकृती चांगली राहील. नावलौकीकात भर पडेल. कायद्याबाहेर जाणे आवडणार नाही. वाढत्या वयानुसार शरीर स्थूल होण्याची भिती. चालण्याचा व्यायाम करा. वरिष्ठांच्या कृपेने उच्च पद प्राप्ती. हाताखालच्या लोकांकडून काम करून घेण्याची कला अवगत होईल. विद्याव्यासंगात रस राहील. न्यायी स्वभावामुळे लोकप्रियता वाढेल. राजकारण्यांना याची विशेष प्रचिती येईल.

पंचमात बुध आहे. परिस्थितीत एकदम बदल होईल. उपासनेत मन लागेल. त्यामुळे मानसिक शांती प्राप्त होईल. लेखक वर्गाला साहित्यसेवेत यश मिळेल. विद्याव्यासंगात वृद्धी होईल. आर्थिक आवक वाढेल. धनसंग्रह करणे शक्य होईल. राजकारणी लोकांना एखादे प्रतिष्ठेचे पद प्राप्त होईल. बुद्धीमत्तेने इतरांना चकीत कराल.

स्त्रियांसाठी -पतीराजांचे उत्तम सहाकार्य लाभेल. मात्र कलह टाळण्यासाठी नम्रतेचे पथ्य पाळणे जरूरी आहे. उत्साह चांगला राहील. कलाकौशल्यात प्रगती होईल.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांनी स्वास्थ्याची काळजी घ्यावी. विद्येत उत्तम प्रगती होईल. शैक्षणिक खर्चाला पालकांकडून पैसे उपलब्ध होतील. वाचनाबरोबर लिहीण्याचा सराव वाढवा फायद्याचे राहील.

शुभ तारखा – 2, 3, 5, 8, 12, 15, 17, 18, 19, 21, 22, 28, 29

सप्टेंबर- 2023

महिन्याच्या सुरुवातीला राशी धनस्थानी गुरू-राहू-हर्षल, चतुर्थात-शुक्र , पंचमात रवि-बुध, षष्ठात मंगळ, सप्तमात केतू, दशमात प्लुटो, लाभात शनि, व्ययात नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे

चतुर्थस्थानी शुक्र आहे. आनंदी वृत्ती राहील. आर्थिक आवक उत्तम राहील. न्यायीपणामुळे लोकप्रियतेत भर पडेल. आपल्या कार्यात प्राविण्य मिळवाल. आकर्षक व मधुर बोलण्यामुळे वातावरण खेळीमेळीचे राहील. वाहनसुख चांगले मिळेल. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार असल्यास हा महिना चांगला आहे. घर आणि स्थावरासंबंधी चांगल्या घटना घडतील.

राशीच्या तनुस्थानी हर्षल असल्याने धाडसाकडे कल राहील. स्वभाव कमालीचा लहरी व चंचल एवढेच नव्हे तर विचीत्र असा राहील. राजकारणात असाल तर आश्वासनांचा पाऊस पाडाल. कितीही फीलगुड वाटले तरी इतरांना वाटेलच असे नाही. स्वभाव शांत राहील.

स्त्रियांसाठी -नातेवाईक व शेजार्‍यांशी संबंध चांगले राहतील. ललीत कलांत प्रगती होईल. काम नीटनेटकेपणाने केल्यामुळे मानसिक समाधान लाभेल.

विद्यार्थ्यांसाठी- विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परिक्षेसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. खेळ व टी.व्ही. कडे तूर्त दुर्लक्ष करणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे राहील.

शुभ तारखा – 1, 3,4, 7, 8, 10, 11, 16, 17, 18, 19, 22, 23,24, 26, 27, 29,30

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या