– सौ.वंदना अनिल दिवाणे
ऑक्टोबर – 2023
महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी शुक्र, द्वितीयात रवि-बुध, तृतीयात मंगळ, चतुर्थात केतू, सप्तमात प्लुटो, अष्टमात शनि, नवमात नेपच्यून, दशमात गुरू-राहू-हर्षल अशी ग्रहस्थितीे आहे.
तुमची रास – राशीची आद्याक्षरे हो, हू, हे, डा, डी, डू, डे, डो अशी आहेत. राशीचे चिन्ह खेकडा आहे. राशी स्वामी-चंद्र, तत्त्व-जल, चर राशी असल्याने चंचल स्वभाव. उत्तर दिशा फायदयाची राहील. सत्वगुणी, वर्ण-ब्राह्मण, स्वभाव सौम्य, कफ प्रवृत्ती, राशीचा अंमल छातीवर आहे. शुभ रत्न-मोती, शुभ रंग-पांढरा, क्रिम कलर, शुभ दिवस-सोमवार, शंकराची उपासना फायद्याची आहे. शुभ अंक- 2, शुभ तारखा- 2/11/20/29. मित्रराशी- वृश्चिक, मीन, तुला. शत्रुराशी- मेष,सिंह, धनु, मिथून,मकर, कुंभ. अध्ययनाची आवक. जलप्रिय, भावनाप्रधान, कुशल प्रबंधक, कल्पनाशील, योजना तयार करण्यात प्रविण, भावुक, विचारी, परोपकारी ईश्वरभक्तीमध्से रस.
द्वितीयात रविमुळे वडील मंडळीकडून आर्थिक सहकार्याची शक्यता निर्माण करीत आहे. खर्चिक व उदार स्वभावाला लगाम घाला. अन्यथा कर्जाचा विचार करावा लागेल.
स्त्रियांसाठी -लग्नी शुक्र आहे. सौदर्यवर्धक, सुपुत्र सुख प्रदान करणारा, कलाकौशल्यासाठी प्रगतिकारक तर आहेच शिवाय हौस मौज करण्यासाठी पूरक आहे. स्त्री जीवनाचा खर्या अर्थाने उपभोग घ्याल.
विद्यार्थ्यांसाठी -विद्यार्थ्यांनी स्वास्थ्याची काळजी घ्यावी. विद्येत उत्तम प्रगती होईल. शैक्षणिक खर्चाला पालकांकडून पैसे उपलब्ध होतील. वाचनाबरोबर लिहीण्याचा सराव वाढविणे फायद्याचे राहिल.
शुभ तारखा – 1, 6, 7, 8, 10, 20, 21, 22, 23, 24, 26
नोव्हेंबर – 2023
महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी रवि, तृतीयात शुक्र, चतुर्थात मंगळ-बुध-केतू, सप्तमात प्लुटो, अष्टमात शनि, नवमात नेपच्यून, दशमात गुरू-राहू-हर्षल अशी ग्रहस्थिती आहे.
चतुर्थात मंगळ आहे. पत्नीचा शब्द टाळता येणार नाही. साहजिकच त्याचा परिणाम मातृसुखात अडचणी येण्याची शक्यता आहे. वाहनांपासून अपघात होऊ नये याची काळजी घ्या. राहत्या घरात चोरी किंवा आग लागण्याची भिती आहे. सावध रहा. इस्टेटीचे व्यवहार पुढे ढकला. वृद्धांनी घरातील मंडळींशी जमवून घ्यावे. अन्यथा उगीचच मनःस्तान सहन करावा लागेल. नोकरी, उद्योग व्यवसायाच्या बाबतीत परिस्थिती उन्नतीकारक राहील. विशेषतः कापूस, चांदी, हिरे यांच्या व्यापार्यांसासाठी फार चांगला महिना आहे. वाहन खरेदीसाठी योग्य वेळ आहे. बंधू सुख उत्तम राहील.
चतुर्थात बुध आहे. एकाच उद्योगधंदयात सारखे काम करीत राहण्याचा कंटाळा येईल. पण तसे करणे फायद्याचे राहणार नाही. धरसोड वृत्तीमुळे पैसा, प्रयत्न व वेळ वाया जातो आणि पदरात शेवटी काही रहात नाही. नातेवाईकांशी म्हणावे तसे पटणार नाही. पिताश्रीपासून काही मिळण्याची अपेक्षा करू नका. मातृसुखात काही ना काही अडचणी येतील.
स्त्रियांसाठी -तृतीयात शुक्र आहे. नातेवाईक व शेजारी पाजार्यांशी संबंध चांगली राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल.
विद्यार्थ्यांसाठी -विद्यार्थ्यांना चांगले अभ्यासू मित्र मिळतील. विद्याभ्यात मन लागेल. उत्साह दांडगा राहील. क्लासेसमुळे बरीच धावपळ होईल.
शुभ तारखा – 1, 2, 3, 5, 6, 12, 14, 15, 16, 18, 21, 22, 25, 28, 29
डिसेंबर – 2023
महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या तृतीयस्थानी- केतू, चतुर्थात शुक्र, पंचमात रवि-मंगळ, षष्ठात बुध, सप्तमात प्लुटो, अष्टमात शनि, नवमात राहू-नेपच्यून, दशमात गुरू-हर्षल अशी ग्रहस्थिती आहे.
दशमस्थानी गुरू आहे. पराक्रमाला जोर येईल. बर्याच वेळा त्यात यश मिळेल. स्थावर इस्टेटीपासून उपजिवीका होण्याइतपत उत्पन्न काहींना मिळू शकेल. तेजस्वी वृत्ती राहील. उत्तम सल्लागार म्हणून प्रसिद्धी मिळेल. उठसुट रागावणे चांगले नाही. त्यावर नियंत्रण ठेवा. लष्करी वृत्तीवर अंकुश लावावा. धैर्यशील वृत्तीमुळे कोणत्याही संकटात माघार घ्यावी लागणार नाही. वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. जनसेवेची हौस वाटेल. व्यापार. वैद्यकीय, यांत्रिकी कामे अथवा राजकृपा यातून अर्थप्राप्ती होईल.
तृतीयस्थानी केतू असता भावा बहिणाशी संबंध विशेष चांगले रहाणार नाही. कलह होण्याची शक्यता आहे. मातेशीही पटणे कठीण जाते. शत्रूंचा नाश होतो. धनसंग्रहात वाढ होईल.
स्त्रियांसाठी – चतुर्थात शुक्र आहे. आनंदी वृत्ती प्रदान करील. कुटुंबात हुकूमाची राणी व्हाल. हातात पैसा खेळत राहील. मनासारखी शॉपिग कराल. पतीराजांची मर्जी बहाल होईल.
विद्यार्थ्यांसाठी- विद्यार्थीदशा हा खरा तर जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. अभ्यासासाठी उत्साह टिकून राहील. काहीेंना सरकारी मदत मिळेल.
शुभ तारखा – 1, 2, 3, 5, 6, 7, 8, 14, 15, 17, 18, 21, 25, 27, 31