Monday, November 25, 2024
Homeभविष्यवेधत्रैमासिक भविष्य : मिथुन - ललित कला, लेखन यांपासून लाभ होतील

त्रैमासिक भविष्य : मिथुन – ललित कला, लेखन यांपासून लाभ होतील

– सौ.वंदना अनिल दिवाणे

ऑक्टोबर – 2023

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या धनस्थानी शुक्र, तृतीयात रवि-बुध, चतुर्थात मंगळ, पंचमात केतू, अष्टमात प्लुटो, नवमात शनी, दशमात नेपच्यून, लाभात गुरू-राहू- हर्षल अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे का, की, कू, घ, गं, छा, के,को, हा अशी आहेत. राशीचे चिन्ह स्त्री पुरूष युगुल असून स्त्रीच्या हातात वीणा व पुरूषाच्या हातात गदा असे आहे. राशी स्वामी-बुध, तत्व वायु असल्याने मधून मधून भडकण्याची सवय आहे. द्विस्वभावी राशी असल्याने लवकर निर्णय घेता येत नाही. पश्चिम दिशा फायद्याची आहे. राशीचे लिंग पुरूषी असल्याने काही स्त्रियांचे वागणे पुरूषी थाटाचे असेल. त्रिदोष प्रकृती आहे. राशीचा अंमल खांद्यावर आहे. शुभ रत्न-पाचू, शुभ रंग हिरवा, शुभ वार बुधवार, उत्तम ग्रहणशक्ती, अभ्यासू वृत्ती, तरल बुद्धी, हास्यविनोदी, खेळकर स्वभाव, बोलण्यात चातुर्य, तृतीयस्थानी रवि आहे. पराक्रमाला जोर येईल. शरीरप्रकृती उत्तम राहील. समोरच्या व्यक्तीवर तुमच्या प्रभावी व्यक्तिमत्वाची छाप पडेल. शास्त्रीय विषयात आणि ललित कलांत रस वाटेल. स्वभाव दृढनिश्चयी व उद्योगशील राहील. प्रवासाची संधी मिळेल.

स्त्रियांसाठी – द्वतीयात शुक्र आहे. हातात पैसा खेळता राहील. पतिराज खुष राहतील. मधुर बोलण्यामुळे घराकडे तणाव फिरकणार नाही. शेजारी हेवा करतील. विद्येेच्या जोरावर धनप्राप्ती कराल.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थीदशा हा खरा तर जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. अभ्यासासाठी उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल.

शुभ तारखा – 1, 6, 7, 8, 10, 20, 21, 22, 24, 26

नोव्हेंबर – 2023

महिन्याच्या सुरूवातीला राशीच्या धनस्थानी – रवि, चतुर्थात शुक्र, पंचमात मंगळ-बुध-केतू, अष्टमात प्लुटो, नवमात शनि, दशमात नेपच्यून, लाभात गुरू-राहूल-हर्षल अशी ग्रहस्थिती आहे.

पंचमस्थानी मंगळ आहे. आर्थिक आवक उत्तम राहील. मित्रसुख कमी असेल. पुत्राविषयी काही चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे. मुर्खांची संगत टाळावी. ऐषोआरामाची वृत्ती राहील. सट्ट्यासारख्या व्यवहारापासून दूर रहावे. जवळपासचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. क्रीडाक्षेत्राची आवड असणार्‍या खेळात प्रगती होऊन पुढे जाण्याची संधी मिळेल. केमिकल, प्राणीशास्त्र, भूगर्भशास्त्र, वैद्यकीय, विषयाशी संबंधित काम करणार्‍या लोकांची प्रगती होईल.

लाभस्थानी गुरू आहे. हा गुरू लाभदायक आहे. अनेक उत्तम मित्र मिळतील. मित्रांचा तुमच्यामुळे चांगला फायदा होईल. वाहनसुख चांगले राहील. वाहनखरेदीचा विचार असल्यास आताच तो उरकून घ्यावा. थोर लोकांचा स्नेह संपादन होईल. संततीसुख चांगले राहील. पुत्र जन्माबरोबरच भाग्योदयास प्रारंभ होईल. बुद्धी अतिशय तीक्ष्ण राहील. करिअरमध्ये मोठा अधिकार प्राप्त होईल. खजिना मौल्यवान वस्तूंनी भरलेला असेल. आंतर्मनाने पुढे घडणार्‍या घटना आधीच कळू शकतील.

स्त्रियांसाठी – चतुर्थात शुक्र आहे. आनंदी वृत्ती प्रदान करील. कुटुंबात हुकूमाची राणी व्हाल. हातात पैसा खेळत राहील. मनासारखी शॉपिग कराल. पतीराजांची मर्जी बहाल होईल.

विद्यार्थ्यांसाठी –विज्ञान व कला शाखा दोन्हीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळावे. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करणे चांगले. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

शुभ तारखा – 1, 2, 3, 5, 6, 12, 14, 15, 16, 18, 21, 22, 25, 28, 29

डिसेंबर – 2023

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या चतुर्थस्थानी-केतू, पंचमात शुक्र, षष्ठात रवि-मंगळ, सप्तमात बुध, अष्टमात प्लुटो, नवमात शनि, दशमात राहू-नेपच्यून, लाभात गुरू-हर्षल अशी ग्रहस्थिती आहे.

पंचमात शुक्र आहे. सरकार दरबारी वजन वाढेल. कन्यांचे विवाह सुस्थळी होऊन जावईदेखील सज्जन मिळतील. गूढशास्त्राचे आकर्षण राहील. देवीची उपासना लाभदायक होईल. शत्रुवर विजय मिळेल. प्र्रेमप्रकरणात फसगत होण्याची शक्यता आहे. नवविवाहितांचा भाग्योदय होईल. तीर्थयात्रा घडण्याचे योग आहेत. ललित कला, लेखन, सट्टे, शेअर्स यांपासून लाभ होतील. कन्येचा विवाह जुळण्याचे योग आहेत. सप्तमस्थानी बुध आहे. विवाहोेत्सुकांचे विवाह जुळतील. भावी पत्नी सुविद्य असेल. व्यापार्‍यांना चांगले भागीदार मिळतील. त्यामुळे आर्थिक आवक वाढेल. कला कौशल्यात प्रगती होईल. विनोदप्रियतेमुळे घरात व घराबाहेर तणाव राहणार नाही.

चतुर्थस्थानी केतू आहे. सत्यवादी, पराक्रमी, बोलणे गोड, मधुर व आकर्षक राहील.

स्त्रियांसाठी – व्यक्तिमत्वात वृद्धी करण्यासाठी पार्लरला भेट द्यावीशी वाटेल. पतीराज खुष होतील. अलंकार खरेदीचा योग आहे.

विद्यार्थ्यांसाठी- शरीरप्रकृती चांगली राहील त्यामुळे अभ्यासात उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल. अभ्यास मंडळात सामील असलेले मित्र अभ्यासू व हुशार असतील.

शुभ तारखा – 1, 2, 5, 6, 7, 8, 14, 15, 17, 18, 21, 25, 27, 31

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या