Friday, October 4, 2024
Homeभविष्यवेधत्रैमासिक भविष्य - तुळ : स्थावरासंबंधी लाभ होतील

त्रैमासिक भविष्य – तुळ : स्थावरासंबंधी लाभ होतील

सौ.वंदना अनिल दिवाणे

नोव्हेंबर – 2023

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी मंगळ-बुध-केतू, चतुर्थात प्लुटो, पंचमात शनि, षष्ठात नेपच्यून, सप्तमात गुरू-राहू-हर्षल, दशमात रवि,व्ययात शुक्र अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू,ते अशी आहेत. राशीचे चिन्ह तराजू आहे. राशी स्वामी शुक्र. तत्त्व-वायू, चर राशी असल्याने स्वभाव चंचल. पश्चिम दिशा फायद्याची आहे.लिंग पुरूष, त्यामुळे काही स्त्रियांची वागणूक पुरूषी थाटाची आहे. रजोगुणी, स्वभाव क्रूर, त्रिदोष प्रवृत्ती, राशीचा अंमल मांड्यांवर आहे. शुभ रत्न हिरा, शुभ रंग-सफेद, शुभ दिवस-शुक्रवार, देवता-लक्ष्मी व संतोषी माता, शुभ अंक-6, शुभ तारखा-6/15/24. मित्र राशी-मिथून, मकर, कुंभ, धनु. शत्रुराशी- सिंह. संशोधन कार्याची आवड. आत्मविश्वास दांडगा. वाणी आकर्षक व प्रभावशाली, नकारात्मक गुणईर्षा, घमेंड व अतिधूर्तता. मानसिक संतुलन चांगले. विनोदी वृत्ती.

लग्नी बुध आहे. प्रवास सुखकारक घडतील. विद्याव्यांसगात भर पडेल.मित्रमंडळींशी मिळून मिसळून वागाल. चेहर्‍यावर प्रसन्नता झळकेल. मित्रांच्या अडचणीला धावून जाल. स्वधर्मावर चांगली श्रद्धा राहील.

स्त्रियांसाठी – ग्रहांची चौकट महिलांसाठी चांगली आहे. फॅशनची नवीन वस्त्रे व अलंकार खरेदी यासंबंधी मनासारख्या गोष्टी घडतील. त्यासाठी पतिराजांची उत्तम साथ मिळेल. मुलांंवर नियंत्रण ठेवावे.

विद्यार्थ्यांसाठी – विज्ञान व कला शाखा दोन्हीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळावे. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करणे चांगले. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

शुभ तारखा – 1, 2, 3, 12, 14, 15, 16, 18, 21, 22, 25, 28, 29

डिसेंबर – 2023

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी शुक्र, द्वितीयात रवि-मंगळ, तृतीयात बुध, चतुर्थात प्लूटो, पंचमात शनि, षष्ठात राहू-नेपच्यून, सप्तमात गुरू-हर्षल, व्ययात- केतू अशी ग्रहस्थिती आहे.

लग्नी शुक्र आहे. व्यक्तीमत्वाला झळाळी येईल. कामात दंग रहाल. स्वतःची जागा व संसार याबद्दल प्रेम राहील. हरहुन्नरीपणामुळे कोणतेही नवीन काम आत्मसात करून त्यापासून धनप्राप्ती करू शकाल. कामात व्यस्त रहाणे आवडेल. विवाहोत्सुक तरूणांना सुंदर पत्नी मिळेल.

सप्तमातील हर्षल विवाहाच्या बाबतीत विवाहोत्सुंकांना चमत्कारीक अनुभव देईल. अन्य जनांना पत्नीसंबंधी विवंचना निर्माण होण्याची शक्यता आहे. वेळीच काळजी घ्यावी. विवाह फार उशीरा होण्याची शक्यता आहे. विवाहसंबंध ठरला असे वाटावे आणि ऐनवेळी विवाह दुसर्‍यास्थळी व्हावा असाही काही अनुभव येईल.

द्वितीयातील रविमुळे वडील मंडळींकडून आर्थिक सहकार्याची शक्यता निर्माण होत आहे. पित्याकडून किंवा चुलते वगैरेकडून आर्थिक सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. खर्चिक व उदार स्वभावाला लगाम लावा.

स्त्रियांसाठी -लग्नी शुक्र आहे. सौदर्यवर्धक, सुपुत्र सुख प्रदान करणारा, कलाकौशल्यासाठी प्रगतिकारक तर आहेच शिवाय हौस मौज करण्यासाठी पूरक आहे. स्त्री जीवनाचा खर्‍या अर्थाने उपभोग घ्याल.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांनी स्वास्थ्याची काळजी घ्यावी. विद्येत उत्तम प्रगती होईल. शैक्षणिक खर्चाला पालकांकडून पैसे उपलब्ध होतील. वाचनाबरोबरच लिहीण्याची सराव वाढविणे फायद्याचे ठरेल.

शुभ तारखा – 1, 2, 5, 6, 7, 8, 14, 15, 17, 18, 21, 25,27, 31

जानेवारी – 2024

महिन्याच्या सुरुवातीला राशी धनस्थानी रवि-मंगळ, तृतीयात बुध, चतुर्थात प्लुटो, पंचमात शनि, षष्ठात राहू-नेपच्यून, सप्तमात गुरु-हर्षल, व्ययात शुक्र-नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

पंचमात शनी आहे. शरीरप्रकृती सुदृढ राहील. शत्रुवर विजय िेमळवाल. स्थावरासंबंधी लाभ होतील. सार्वजनिक संस्था, राजकारण, व्ही.आय.पी. लोकांशी संबंध यात चांगले यश मिळेल. मुलांची प्रगती होईल. नोकरीत यश मिळेल. व्यापार्‍यांना लाभ होतील.

सप्तमस्थानी गुरू आहे. विवाहोत्सुक तरूण तरूणींना चांगला जोडीदार मिळेल. थोर लोेकांची संगत प्राप्त होईल. उत्तमस्थळी प्रवास घडेल. स्वजातीच्या उन्नतीसाठी कार्य कराल. लबाड लोकांनाही वश करू शकाल. नवविवाहीतांचा भाग्योदय होईल. कोर्ट कचेर्‍यांची कामात वारंवार यश मिळेल. स्वतःच्या सामर्थ्याबद्दल गर्व वाटेल. मात्र संयम ठेवणे आवश्यक आहे. विद्वान लोकांत मान मिळेल.

स्त्रियांसाठी – महीलांचा धार्मिकतेकडे कल राहील. बोलतांना कटू शब्द टाळल्यास घरात तणावरहीत वातावरण राहील. अपघातातून आश्चर्यकारकरित्या सुटका होईल. पतीराज शब्दाबाहेर जाणार नाही.

विद्यार्थ्यांसाठी- िेवद्यार्थ्यांना चांगले अभ्यासू मित्र मिळतील. विद्याभ्यात मन लागेल. उत्साह दांडगा राहील. क्लासेसमुळे बरीच धावपळ होईल.

शुभ तारखा – 1, 2, 5, 6, 8, 14, 15, 17, 18, 21, 25, 27, 31

- Advertisment -

ताज्या बातम्या