Saturday, November 2, 2024
Homeभविष्यवेधत्रैमासिक भविष्य - धनु : सांपत्तिक लाभ होतील

त्रैमासिक भविष्य – धनु : सांपत्तिक लाभ होतील

सौ.वंदना अनिल दिवाणे

ऑगस्ट – 2023

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या षष्ठ धनस्थानी प्लुटो, तृतीयात शनि, चतुर्थात-नेपच्यून, पंचमात गुरू-राहू-हर्षल, अष्टमात रवि, नवमात बुध-मंगळ-शुक्र,लाभात केतू अशी ग्रहस्थितीे आहे.

तुमची रास – राशीचे चिन्ह शरिराचा वरचा भाग धनुर्धारी सज्ज पुरूषाचा असा पुरूष मुखरहीत घोड्यावर बसलेला असे आहे. राशी स्वामी- गुरू, तत्व-अग्नी, त्यामुळे काहीसा रागीट स्वभाव, द्विस्वभावी रास असल्याने लवकर निर्णय घेता येत नाही. पूर्व दिशा फायद्याची आहे. लिंग पुरूष त्यामुळे काही स्त्रियांचे वागणे पुरूषी थाटाचे. वर्ण-क्षत्रिय, स्वभाव-क्रूर, पित्त प्रकृती, राशीचा अंमल मांड्यांवर आहे. शुभ रत्न-पुष्कराज, शुभ रंग-पिवळा, शुभ दिवस-गुरूवार, देवता-विष्णू, शुभ अंक-3, शुभ तारखा-3/12/21/30. मित्रराशी-मेष,सिंह. शत्रुराशी-कर्क, मीन, वृश्चिक. गुणग्राही वृत्ती, अतिधूर्तता, व्यावहारिकता चांगली, स्वतःला डावलून दुसर्‍यांचे कल्याण. मुडी स्वभाव,

अष्टमस्थानातील असणार्‍या रविमुळे नवविवाहीतांना लाभ होईल. अशा लोकांचा विवाहापश्चात भाग्योदय सुरू झाल्याची प्रचीती येईल. नववधूवर असलेल्या प्रेमामुळे म्हणा किंवा अन्य कारणामुळे घरातील इतर मंडळींशी पटणार नाही. लहान लहान गोष्टीवरून कलह निर्माण होतील.

स्त्रियांसाठी – व्यक्तिमत्वात वृद्धी करण्यासाठी पार्लरला भेंट द्यावीशी वाटेल. पतीराज खुष होतील. अलंकार खरेदीचा योग आहे.

विद्यार्थ्यांसाठी – विज्ञान व कला शाखा दोन्हींच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळावे. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करणे चांगले. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

शुभ तारखा – 2, 3, 5, 9, 12, 15

सप्टेंबर – 2023

महिन्याच्या सुरूवातीला राशी धनस्थानी-प्लुटो, तृतीयात शनि, चतुर्थात-नेपच्यून, पंचमात गुरू-राहू- हर्षल, अष्टमात शुक्र, नवमात रवि-बुध, दशमात मंगळ, लाभात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

अष्टमात शुक्र पत्नीकडील नातेवाईकांकडून आर्थिक सहकार्य मिळण्याची शक्यता दर्शवित आहे. मात्र धनप्राप्तीच्या बाबतीत दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात. धनप्राप्ती शक्यतो स्वकष्टावर आधारित असावी. कमी श्रमात किंवा विनाश्रम अधिक धनप्राप्तीच्या आशेने अवैध मार्गाचा अवलंब करू नये. भ्रष्टाचार सुरूवातीला अमृतासारखा गोड वाटला तरी त्याचा परिणाम शेवटी विषासारचा भयंकर असतो.

तृतीयस्थानी शनी आहे. शत्रूपक्षामध्ये फाटाफूट पाडून त्यांच्यावर मात करण्यात यश मिळेल. अकल्पितपणे भाग्योदय होईल. सरकार दरबारी वजन वाढेल. पुत्र व ग्रह यांचे सुख उत्तम राहील. कामात एकाग्रता साध्य होईल. बौद्धिक कामात याची विशेष प्रगती होईल. पत्नीच्या प्रकृतीची स्त्रियांसाठी – अष्टमात शुक्र आहे. महिलांना ‘ग‘ ची बाधा संभवते. त्यातून कटू भाषण व कटकटी होऊ नये यासाठी जागरूक रहा. पतीराज खुष रहातील. कौटुंबिक खर्चाला पैसा कमी पडणार नाही.

विद्यार्थ्यांसाठी – तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा – 1, 4, 7, 8, 10, 11, 12, 14, 17, 21, 22, 26, 27, 30

ऑक्टोबर- 2023

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या धनस्थानी-प्लूटो, तृतीयात शनी, चतुर्थात नेपच्यून, पंचमात गुरू-राहू-हर्शल, नवमात शुक्र, दशमात रवि-बुध, लाभात मंगळ-केतू अशी ग्रहस्थिती आहे.

लाभस्थानी मंगळ आहे. सांपत्तिक लाभ होतील. त्यासाठी मित्रांचे उत्तम सहकार्य मिळेल. मात्र मित्रांची पारख आवश्यक आहे. मतलबी, लबाड मित्र असण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्याची आवड वाटेल. वाईट संगती ठेवल्यास भांडणाचे वारंवार प्रसंग येतील. स्थावर ईस्टेटीसंबंधी लाभ होण्याचा संभव आहे.

पंचमस्थानातील गुरू हा स्वतंत्र भाग्ययोग आहे. वैभव प्राप्त होईल. विद्वत्तेचा लौकीक सगळीकडे पसरेल. वाडवडिलांच्या पुण्याईने भाग्योदय होईल. संततीसुख चांगले राहील. लेखनाची आवड असलेले उत्तम लेखन होईल. लोकशिक्षणात भाग घेण्याची संधी मिळेल. मोठ मोठ्या समारंभात सहभागी होण्याची संधी प्राप्ती होईल. सट्ट्यासारख्या व्यवहार व व्यापारात भाग घ्यावासा वाटेल.

लाभस्थानी केतू आहे. पराक्रमाकडे कल राहील. समाधानी वृत्ती राहील. सत्कर्मे कराल. मान्यता प्राप्त होईल. हाती घेतलेले काम लवकर पूर्ण कराल. सत्कर्माची फळे लवकर मिळतील.

स्त्रियांसाठी – नवमात शुक्र आहे. महिलांच्या व्यक्तिमत्वात सौंदर्याच्यादृष्टीने वृध्दी होईल. पती-पुत्र सुख उत्तम राहील. मात्र कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांसाठी-पंचमात गुरू आहे. विद्येतील प्रगतीसाठी तो अतिशय शुभ आहे. वाडवडिलांच्या पुण्याईने व आशीर्वादाने अभ्यासात मन एकाग्र होईल. टक्केवारी वाढविणे सोपे जाईल.

शुभ तारखा – 1, 6, 7, 10, 20, 22, 23, 24, 29

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या