Friday, November 1, 2024
Homeभविष्यवेधत्रैमासिक भविष्य- वृषभ : स्थावरासंबंधी शुभ घटना घडतील

त्रैमासिक भविष्य- वृषभ : स्थावरासंबंधी शुभ घटना घडतील

सौ.वंदना अनिल दिवाणे

ऑक्टोबर – 2023

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशी तृतीयस्थानी -शुक्र, चतुर्थात रवि-बुध, पंचमात मंगळ, षष्ठात केतू, नवमात प्लुटो, दशमात शनि, लाभात नेपच्यून, व्ययात गुरु-राहू-हर्षल अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो अशी आहे. राशीचे चिन्ह बैल आहे. स्वामी-शुक्र, रास-पृथ्वी तत्त्वाची असल्याने सहनशक्ती चांगली. राशी स्वरूप स्थिर काहीसा आळशी ऐशोरामाची आवड. दक्षिण दिशा फायद्याची आहे. लिंग स्त्री असल्याने स्वभाव लाघवी. रजोगुणी, वर्ण-वैश्य. राशीचा अंमल मुखावर आहे. वाचा स्पष्ट असल्याने प्रभावी अभ्यासाने वक्तृत्वकला साध्य होऊ शकेल. शुभ रत्न हिरा, शुभ रंग- पांढरा, हिरवा, देवता- लक्ष्मी, संतोषी माता. शुभ अंक-6, शुभ तारीख- ं6/15/24. मित्र राशी -मकर, कुंभ. शत्रू राशी- सिंह, धनु, मीन. चिकाटी व निश्चयी. कष्टाळू, स्वभाव तेजस्वी, बुद्धिवान.

चतुर्थस्थानी रवि आहे. आर्थिक उत्पन्नात वृद्धी होण्यासारख्या उलाढालीत भाग घेण्याची संधी मिळेल. ग्रामीण भागातील शेतीवाडीपासून चांगला फायदा होईल. वृद्धांसाठी हा महिना चांगला राहील. शारिरीक व्याधी कमी होतील. आरोग्य चांगले राहील. बागाईतदारांना हा महिना प्रगतीकारक राहील.

स्त्रियांसाठी – तृतीयात शुक्र आहे. नातेवाईक व शेजारी पाजार्‍यांशी संबंध चांगली राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थीदशा हा खरा तर जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. अभ्यासासाठी उत्साह टिकून राहील. काहीेंना सरकारी मदत मिळेल.

शुभ तारखा – 1, 6, 7, 8, 10, 20, 21, 22, 23, 24, 26

नोव्हेंबर – 2023

महिन्याच्या सुरूवातीला राशी तृतीयस्थानी -रवि,

पंचमात शुक्र, षष्ठात मंगळ-बुध-केतू, नवमात -प्लुटो दशमात शनी, लाभात नेपच्यून, व्ययात गुरू-राहू-हर्षल अशी ग्रहस्थिती आहे.

षष्ठस्थानी मंगळ आहे. शत्रुंच्या कारवाया हाणून पाडण्याचे यात सामर्थ्य आहे. त्यामुळे शत्रुंचा नाश करणे सहज शक्य होईल. स्थावरासंबंधी शुभ घटना घडतील. कुटुंबात निष्कपट वागल्याने कुटुंबात शांतता राहील.पंडीत जनांशी मैत्री होईल. वेळोवेळी मार्गदर्शन लाभेल.

व्ययस्थानी गुरू आहे. वितंडवादावर नियंत्रण ठेवावे. ईश्वरी सत्तेबद्दल म्हणावा असा विश्वास वाटणार नाही. विनाकारण भटकंती बंद करा. पैसा अनाठायी खर्च करू नका. नातेवाईकांशी म्हणावे तसे पटणार नाही. कोणाशी मैत्री करावी किंवा करू नये याचा विवेक बाळगावा. धार्मिक संस्थेचे अधिपत्य करू शकाल. अध्यात्मात प्रगती होईल. एकांत स्थळापासून लाभ होतील. लोकांशी

संबंध नसलेल्या खात्यात नोकरी मिळेल. कर्जापासून दूर रहा. घ्यावेच लागले तर हप्ते वेळेवर भरावेत.

रवि शुक्र जिरेकादश योग होत आहेत. या शुभ योगामुळे सरकारी, निमसरकारी, संस्थातून नोकरी करणारांना अतिशय उत्तम महिना आहे. महिन्याच्या पूर्वार्धात याची प्रचिती येईल.

स्त्रियांसाठी -व्यक्तिमत्वात वृद्धी करण्यासाठी पार्लरला भेंट द्यावीशी वाटेल. पतीराज खुष होतील. अलंकार खरेदीचा योग आहे.

विद्यार्थ्यांसाठी – शरीरप्रकृती चांगली राहील त्यामुळे अभ्यासात उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल. अभ्यास मंडळात सामील असलेले मित्र अभ्यासू व हुशार असतील.

शुभ तारखा – 1, 2, 3, 5, 6, 12, 14, 15, 16, 18, 21, 22, 25, 28, 29

डिसेंबर – 2023

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या पंचमस्थानी केतू, षष्ठात शुक्र, सप्तमात रवि-मंगळ, अष्टमात बुध, नवमात प्लुटो, दशमात शनी, लाभात राहू-नेपच्यून, व्ययात गुरु- हर्षल अशी ग्रहस्थिती आहे.

षष्ठस्थानी शुक्र आहे. नोकरीपासून सुख मिळेल. आहारविहारात जपून रहा. कौटुंबिक सुख अल्प राहील.

दशमस्थानी शनी आहे. भाग्यवृद्धी होईल. राजाप्रमाणे सुख उपभोगाल. आपल्या क्षेत्रात थोर अधिकार मिळतील. शेतकर्‍यांना शेतीपासून लाभ होतील. स्वपराक्रमाने उदयास याल. उद्योगशीलता उत्तम राहील. नम्रतेमुळे लोकप्रियतेत वृद्धी होईल.

नवमात प्लुटो आहे. परदेशगमनाच्या प्रयत्नात असाल तर त्यास यश मिळेल. हे विश्वची माझे घर अशी विश्वबंधुत्वाची भावना राहील. आध्यात्मिक सामर्थ्याच्या साधनेच्या सातत्यातून प्राप्त होईल. व्यवहार चातुर्यामुळे सांसारिक स्थिती उत्तम राहील.

पंचमात केतू आहे. याठिकाणचा केतू धर्माचरण करण्याची ओढ लावेल. उपासनेत चांगले यश मिळेल. मांत्रिक विद्येची आवड निर्माण होईल. हलक्या लोकांची संगत मिळू नये यावर लक्ष ठेवावे.

स्त्रियांसाठी – उपवर कन्यांचे सहज विवाह जुळतील. जावई सज्जन व सुसंस्कृत घराण्यातील मिळतील. विवाहीत स्त्रियांना कौटुंबिक सुख उत्तम राहील. काटकसर केल्यास आर्थिक अडचणी येणार नाहीत.

विद्यार्थ्यांसाठी- तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा – 1, 2, 5, 6, 7, 8, 14, 15, 18, 21, 25, 27,े 31

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या