Friday, May 3, 2024
Homeभविष्यवेधसमाजात छबी उजळेल

समाजात छबी उजळेल

नोव्हेंबर – 2021

ग्रहस्थिती – आठवड्याच्या सुरुवातीला राशीच्या पंचमस्थानी रवि-बुध-मंगळ, षष्ठात केतू, सप्तमात शुक्र, अष्टमात गुरू- शनी- प्लुटो, नवमात नेपच्यून, लाभात हर्षल, व्ययात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

- Advertisement -

तुमची रास – तुमच्या राशीची आद्याक्षरे- का,की, कू, ध, गं, छा, के, को, हा अशी आहेत. तुमच्या (मिथुन) राशीचे चिन्ह स्त्री-पुरूष युगुल असून स्त्रीच्या हातात वीणा व पुरुषाच्या हातात गदा असे आहे. राशी स्वामी बुध तत्व-वायु असल्याने मधून मधून भडकण्याची सवय द्विस्वभाव राशी असल्याने लवकर निर्णय घेता येत नाही. तुमच्यासाठी पश्चिम दिशा फायद्याची आहे. राशीचे लिंग पुरूष असल्याने काही स्त्रियांचे वागणे पुरूषी थाटाचे असणे शक्य आहे. वर्ण- शुद्र, स्वभाव- क्रुर, प्रकृती त्रिदोष (कफ- वात- पित्त) युक्त राशीचा अंमळ खांद्यावर आहे. शुभ रत्न-पाचू, शुभरंग- हिरवा, शुभ वार- बुधवार उत्तम ग्रहण शक्ती. अभ्यासू वृत्ती तरल बुध्दी, हास्य विनोदी खेळवर स्वभाव. बोलण्यात चातुर्य.

स्त्रियांसाठी – उपवर कन्यांचे विवाह सहज जुळतील. जावई सज्जन व सुसंस्कृत घराण्यातील मिळतील. विवाहित स्त्रियांना कौटुंबिक सुख उत्तम राहील. काटकसर केल्यास आर्थिक अडचणी येणार नाहीत.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थीदशा हा खरं म्हणजे जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. त्यामुळे अभ्यासासाठी उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल.

शुभ तारखा – 1, 4, 5, 6, 9, 10, 12, 13, 16, 20, 21, 23, 24, 25, 28, 30

डिसेंबर – 2021

ग्रहस्थिती – महिन्याच्या सुरूवातीला राशीच्या पंचमात मंगळ, षष्ठात रवि- बुध-केतू, सप्तमात शुक्र, अष्ठमात शनि- प्लूटो, नवमात गुरू-नेपच्यून, लाभात हर्षल, व्ययात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

पंचमस्थानी मंगळ आहे. आर्थिक आवक उत्तम राहील. मित्रसुख कमी. पुत्राविषयी काही चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे. मुर्खाची संगत टाळावी. ऐशोरामाकडे वृत्ती राहील. सट्ट्यासारख्या व्यवहारापासून दूर राहावे. जवळपास प्रवास घडण्याची शक्यता आहे. क्रिडाक्षेत्राची आवड असलेल्यांना खेळात प्रगती होऊन पुढे जाण्याची संधी मिळेल. केमिकल्स, प्राणीशास्त्र, भूगर्भशास्त्र, वैद्यकीय व शास्त्रीय विषयांशी संबंधित काम करणार्‍या लोकांची प्रगती होईल.

षष्ठस्थानी केतू आहे. याठिकाणी केतू असता थोडीतरी नेत्रपिडा होते. शत्रूचा नाश होईल, शत्रूला तुमच्यासमोर उभे राहण्याचे सामर्थ्य राहणार नाही. याठिकाणी केतू असलेल्या बंधूशी चांगले जमेल मातुल पक्षाकडून मात्र मानहानी होण्याची शक्यता आहे. याठिकाणी केतू असल्यामुळे तुमची वृत्ती उदार राहील. साधुजनांचा सहवास घडेल.

स्त्रियांसाठी – सप्तस्थानात शुक्र आहे. वैवाहिकसुख चांगले मिळेल. नवविवाहितांचा भाग्योदय होईल. लोकरंजन करणार्‍या संस्थांमधून प्रगती होऊन प्रयत्न केल्यास आर्थिक लाभ होईल.

विद्यार्थ्यांसाठी –विद्यार्थ्यांची शरीर प्रकृती चांगली राहील. त्यामुळे अभ्यासाठी उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल. तुमच्या अभ्यास मंडळात सामील असलेले मित्र चांगले अभ्यासू असतील.

शुभ तारखा – 1, 6, 8, 9, 11, 13, 15, 19, 20,21, 24, 25, 27 ,28.

जानेवारी – 2022

ग्रहस्थिती – महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या षष्ठात मंगळ-केतू, सप्तमात रवि-शुक्र, अष्ठमात-बुध-शनि-प्लुटो, नवमात गुरु-नेपच्यून, लाभात हर्षल, व्ययात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

अष्ठमातील बुध शत्रुंचा नाश करण्यात समर्थ आहे. तुमच्या यशामुळे निर्माण झालेले शत्रू स्वतःच्याच दुष्ट कारवायात अडकून प्रभावहीन होतील. अतिथी सत्काराची आवड असल्याने व्यवसायाच्या संबंधित आलेले पाहुणे खुश होऊन तुमची समाजातील छबी आणखीच उजळेल. प्रगती होईल.

नवमात गुरू आहे. धार्मिक वृत्ती राहील. लोकांना दिलेला सल्ला त्यांच्यासाठी उपयोगी व लाभदायक ठरल्यामुळे उत्तम सल्लागार म्हणून नावलौकीक होईल. त्यामुळे पुष्कळ लोकांचा विश्वास संपादन होईल. जनशक्तीच्या आधारावर आपल्या उद्योग व्यवसायात प्रगती होईल. विद्वान लोकांत गौरव प्राप्त होईल. परदेश गमन केलेल्यांचा भाग्योदय होईल. वृद्धांना तिर्थयात्रा घडतील. आपल्या शक्तीप्रमाणे देशसेवा घडेल. काटकसरीची वृत्ती ठेवल्यास आर्थिक अडचणी येणार नाहीत. ज्योतीषशास्त्राची व धर्मशास्त्राची आवड वाटेल.

स्त्रियांसाठी – महिलांना व्यक्तिमत्त्व सौंदर्यात वृध्दीकरण्यासाठी ब्युटीपार्लरला भेट द्यावीशी वाटेल. पतीराज खुश राहिल्यामुळे एखाद्या अलंकाराची खरेदी होण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांसाठी – विज्ञान व कला शाखा दोन्हीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळावे. मित्रमंडळी सिमीत ठेवावी. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करणे चांगले. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

शुभ तारखा – 3, 4, 5, 8, 10, 11, 14, 18, 20, 22, 23, 26, 29.

- Advertisment -

ताज्या बातम्या