Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशभारतात ११ सप्टेंबरला एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा

भारतात ११ सप्टेंबरला एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा

मुंबई | Mumbai

ब्रिटिश राजघराण्याच्या मानाच्या गादीवर गेली सात दशके विराजमान असलेल्या ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वृद्धपकाळाने निधन झालं आहे. त्या ९६ वर्षांच्या होत्या.

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. स्कॉटलंडमधील बाल्मोरल कॅसल या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनावर जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे.

महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल भारतानंही दु:ख व्यक्त केलंय. भारतानं एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल भारतात एक दिवसाचा दुखवटा पाळण्याचे आदेश दिलेत. भारताच्या गृह मंत्रालयानं हा आदेश जारी केलाय. ११ सप्टेंबरला संपूर्ण भारतात एक दिवसाचा शोक पाळला जाणार असल्याचं आदेशात नमूद करण्यात आलंय.

- Advertisment -

ताज्या बातम्या