Tuesday, March 25, 2025
Homeनगरराधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच शिर्डी मतदारसंघात जल्लोष

राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच शिर्डी मतदारसंघात जल्लोष

लोणी |वार्ताहर| Loni

भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मंत्रीपदाचा शपथविधी सोहळ्याचा आनंददायी क्षण लोणी ग्रामस्थांनी जल्लोषात साजरा केला. शिर्डी मतदार संघामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातही मंत्री विखे पाटील यांच्या मंत्रीपदी झालेल्या निवडीचा जल्लोष करण्यात आला आहे. भूमीपुत्राचा शपथविधी सोहळा ग्रामस्थांनी सामूहिकपणे पाहण्यासाठी लोणी बुद्रुक गावात मोठ्या स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. अबाल वृध्दांनी याठिकाणी गर्दी करून, भूमीपुत्राच्या शपथविधीच्या सोहळ्याचा आनंद घेतला. योगायोगाने लोणी बुद्रुक गावचे ग्रामदैवत म्हसोबा महाराज यांचा यात्रोत्सव सध्या सुरू आहे. शपथविधी सोहळ्याचा आनंद ग्रामस्थांनी फटाके आणि ढोलताशे वाजवून व्दिगुणीत केला.

- Advertisement -

ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी ग्रामदैवत म्हसोबा महाराजांचे दर्शन घेऊन तसेच यात्रेत काही काळ सहभाग घेतला. गावातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे आशिर्वाद आणि युवकांच्या शुभेच्छा स्विकारुन ते शपथविधी सोहळ्याकरिता नागपूरकडे रवाना झाले. दुपारी 4 वाजता शपथविधी सोहळा पाहण्यासाठी गावातील क्रिडा संकुलाच्या मैदानावर तसेच म्हसोबा महाराजांच्या मंदिरा जवळ स्क्रिन लावण्यात आले होते. याठिकाणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ना.विखे पाटील यांच्या नावाची घोषणा होताच युवकांनी भारतीय जनता पक्ष तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जयजयकाराच्या घोषणा देवून जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी तसेच ढोल ताशांच्या तालावर कार्यकर्त्यांनी नाचण्याचाही आणि फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला. शिर्डी विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावांमध्ये महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विखे पाटील यांच्या मंत्रीपदी झालेल्या निवडीचा आनंद व्यक्त केला आहे.

लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयासमोरही फटाक्यांची आतषबाजी करून, पेढे आणि मिठाईचे वाटप करून हा आनंद सोहळा साजरा करण्यात आला. जनसेवा कार्यालय लोणीच्या प्रांगणातही फटाके वाजवून नामदार साहेबांच्या मंत्री पदी झालेल्या निवडीचा आनंद साजरा करण्यात आला आहे.

विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय मंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा, मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, ना.अजित पवार यांनी अतिशय विश्वासाने माझ्यावर दिलेली जबाबदारी यशस्वी पार पाडण्याचा प्रयत्न माझा राहील. शिर्डी मतदार संघातील जनतेनेही ज्या ऐतिहासिक मताधिक्याने मला विजयी केले त्यांचाही विश्वास विकास कामांमधून सार्थ ठरविण्यासाठीच भविष्यात काम करणार आहे.
– ना. राधाकृष्ण विखे पाटील

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...